धक्कादायक! ठाकरे सरकारचा १८ हजार ६७५ कोटींचा क्रेडीट नोट्स घोटाळा!

    16-Nov-2023
Total Views | 76
 
uddhav
 
 
मुंबई : ठाकरे सरकारचा १८ हजार ६७५ कोटींचा क्रेडीट नोट्स घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्यांनी उघड केला आहे. ठाकरे सरकार आणि बीएमसीने ३५,००० PAP प्रकल्पग्रस्तांसाठी २ बिल्डरना कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया २०२१ मध्ये सुरू केली. मार्च २०२२ मध्ये बिल्डर्सना अशी ४ कंत्राटे दिली. जुहू आणि मालाडच्या २ करारांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रकल्पग्रस्त परिवाराचे पुनर्वसन ह्या नावाने २०,००० कोटींचा PAP घोटाळा आणि क्रेडीट नोट्स यासंदर्भात सोमय्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
 
 
 
 
गेल्या महिन्यात बीएमसीद्वारे हवाला व्यव्हारांद्वारे ४१५ कोटीचे क्रेडिट नोट्स पेमेंट झाले. चोरडिया बिल्डर्सला मुलुंड, भांडुप, प्रभादेवी प्रकल्पासाठी ह्या हस्तांतरणीय क्रेडिट नोट्स अदा केल्या. त्यांनी १० % डिस्काउंट नी १०० बिल्डर्स, कंपन्यांना ह्या क्रेडिट नोट्स विकल्या. एकूण 18.675 कोटीचा हस्तांतरणीय क्रेडिट नोट्स अदा केल्या आहेत. ही रक्कम बीएमसीच्या नियमित महसूल उत्पन्नातून भराायची आहे.
 
हस्तांतरणीय क्रेडिट नोट्स तात्काळ थांबवण्याची विनंती मी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी. अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मी यासंदर्भात भेट घेणार आहे. अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121