‘सलाम आरती’ बंद करा, मेळकोटे मंदिराच्या पुजारींनी सरकारला केली विनंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2022   
Total Views |
 
Salam Arti 1

 
मेलकोटे : कर्नाटकच्या श्री चेलुवनारायण स्वामी मंदिर पुजाऱ्यांनी ‘सलाम आरती’ बंद करण्याची मागणी केली आहे. पुजारी आणि मंदिर कर्मचाऱ्यांनी कर्नाटक राज्य सरकारला ही प्रथा बंद करण्याची विनंती केली आहे. टीपू सुलतानने ज्यावेळी मंदिराला भेट दिल्यापासून या प्रथेची सुरुवात झाली होती. ती आजही सुरू आहे. मात्र, इतिहासकारांच्या म्हण्यानुसार, टीपूच्या भेटीचा पुरावा उपलब्ध नाही.
सायंकाळी इथल्या राजगोपुरासमोर केलेल्या महामंगलार्थीचा एक भाग म्हणून दोन मशाली पेटवल्या जातात. त्यांना धरून असलेले दोघेजण तीनदा डोकं टेकवतात. कथितपणे ‘सलाम अराठी’ प्रथेला हे नाव मुस्लिमांनी केलेल्या सलामसारखे असल्यामुळे दिले गेले आहे. मेळकोटे श्री चेलुवनारायण स्वामी मंदिराच्या प्रशासानानी अतिरिक्त उपायुक्तांना ही प्रथा बंद करण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, “एक हजार वर्षांहून अधिक काळ मंदिरात संध्यारती (सायंकाळची पूजा) केली जाते. यासोबतच टीपूच्या राजवटीत ‘सलाम आरती’ सुरू करण्यात आली. याला स्थगिती द्यावी आणि फक्त संध्यारती घेण्यात यावी. काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने कोल्लूर मुकांबिका मंदिरालाही ही प्रथा वगळ्याची विनंती केली होती. त्यावरून कोल्लूर मंदिराच्या पुजाऱ्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, "हा प्रदोष पूजेचा एक भाग असून एकदा टीपूने पूजेत भाग घेतला होता आणि सलाम केला होता, यावरून त्याला सलाम आरती, असे नाव मिळाल्याचे म्हटले जाते.
टीपू सुलतानने १७६५-१७९५ मध्ये कधीतरी मूकांबिका देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती, असा दावा केला जातो. 'विजया कर्नाटक' या कन्नड दैनिकाने लिहिले होते की त्यांच्या भेटीपासून “सलाम आरती नावाची एक आरती रोज रात्री 8.00-8.15 दरम्यान मुख्य देवतेला अर्पण होते”. परंतु लेखक संदीप बालकृष्ण यांनी 'इंडिया फॅक्ट्स' या लेखात या दाव्यांचे खंडन केले होते. त्यांनी स्पष्ट केले की या प्रथेचे मूळ टिपूचे आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही लिखित ऐतिहासिक पुरावा अस्तित्वात नाहीत आणि दिलेल्या काळात टिपूला मंदिरात भेट देणे शक्य नव्हते.
@@AUTHORINFO_V1@@