९२६ रुपयांत हवाई सफर! पण नेमकी कशी? : वाचा सविस्तर

    23-Jan-2022
Total Views | 155

GoFirst

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त 'गो फर्स्ट' या खाजगी विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. 'राईट टू फ्लाय' असे या ऑफरचे नाव असून याअंतर्गत फक्त ९२६ रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करता येणार आहेत. ही ऑफर ११ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या हवाई प्रवासासाठी आहे. त्यासाठी प्रवाशांना २२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यानच तिकीट बुक करता येणार आहेत. या तिकिटासह प्रवास करताना १५ किलोपर्यंत सामान घेऊन झाण्याची परवानगी असेल.
 
 
फक्त देशांतर्गत तिकिटांवर सवलत
गो फर्स्टनुसार ही ऑफर फक्त देशांतर्गत असलेल्या उड्डाणांवर लागू करण्यात आली प्रवाशांना ग्रुप बुकिंग करता येणार नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 
अतिरिक्त शुल्काविना तिकीट रिशेड्युल करता येणार
'या ऑफर अंतर्गत फ्लाइटची तिकिटे प्रवासाच्या तीन दिवस अगोदर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रिशेड्युल करता येतील. मात्र तिकीट रद्द केल्यास ते रद्द करण्याचे शुल्क भरावे लागेल.', असे गो फर्स्ट कंपनीने सांगितले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121