ऑक्सिजनसाठी समर्पीत केलं जीवन, ऑक्सिजनअभावीच झाला मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2021
Total Views |
                                                                                             
                                                                                    
maha_1  H x W:
 
 
चेन्नई / कोल्हापूर : ऑक्सिजन हा मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक.कोरोना महामारी काळात ऑक्सिजन टंचाईचा सामना अनेकांना सहन करावा लागला. परंतू चेन्नईतील एका घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. संपूर्ण आयुष्य ऑक्सिजन वापरावर संशोधन करणाऱ्या डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे.
 
 
कोरोनावर उपचार घेत असताना ऑक्सिजन अभावी अनेक जीव गुदमरून गेले. देशभरात अनेक दुर्घटना घडल्या. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे वाढत चाललेल्या बळींची संख्या ही चिंताजनक आहे. मात्र, आयुष्यभर ऑक्सिजनचा विविध क्षेञात वापर कसा करता येईल यावर संशोधन करणाऱ्या डॉ.काकडे यांचा बळी जाणे ही बाब मनाला चटका लावून गेली.
 
 
मराठमोळा हा शास्त्रज्ञ मूळत: कोल्हापूरचा. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना चेन्नईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस त्यांच्यावर सलग उपचार सुरू होते. काही दिवस ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, त्यांना अचानक व्हेंटीलेटरची गरज लागली. परंतु मंगळवारी रात्री उशीरा अचानक रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा संपला. तिथे उपचार घेणाऱ्या १० जणांचा तडफडून मृत्यू झाला. या १० जणांमध्ये डॉ. काकडे यांचाही सामावेश होता.
 
 
डॉ. काकडे यांचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले, त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनतर 'हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा विविध क्षेत्रातील वापर' यावर त्यांनी संशोधन केले तसेच डॉ.काकडे यांच्या नावावर सात पेटंट होते. त्यांना जपान, अमेरिकेतील फेलोशिपही मिळाली होती. त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळावली होती. मराठमोठ्या शास्त्रज्ञाचा मृत्यू ऑक्सिजनअभावी होणे ज्याने संपूर्ण आयुष्य प्राणवायूसाठी समर्पित केले हे दुर्दैव असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत.
@@AUTHORINFO_V1@@