तिजोरीत खडखडाट ; मोफत लस कशी देणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2021
Total Views |


IMH_1  H x W: 0

 

मुंबई : राज्यातच नाही तर संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे आणि मोफत लसीवरून राज्यात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करायचं यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व मोफत लस देण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आणखी मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.त्याच नियोजन कशाप्रकारे असणार आहे याबाबत महाविकास आघाडीत स्पष्टता नाही.

 

१८ ते ४५ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लस मिळणार नाही हे आता स्पष्ट होऊ लागलंय. त्यामुळे लसीकरणाचा भार हा राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. त्याच मोफत लस देण्याच्या घोषणेवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार १५ ते २५ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी 3 दिवसांपूर्वी केली. त्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आणि संभ्रम नको म्हणून त्यांनी ते ट्विट डिलीटही केलं.काँग्रेस म्हणतेय आम्ही मागणी केली होती. अखेर आज मंत्रिमंडळ बैठक झाली त्यांनंतर संभ्रम संपला आणि पुन्हा एकदा आरोग्यमंत्री टोपे यांनी मोफत लस देणार घोषित केले . पण लस देण्यासाठी काय कार्यक्रम आणि नियोजन आहे याबाबत स्पष्टता तिन्ही पक्षातील नेत्यानी केली नाही.

 

श्रेयवादाची लढाई काही वेळ बाजूला ठेऊया पण मोफत लस देत असताना राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भार पडणार आहे. लस उत्पादक कंपन्यांनीही आपले दर जाहीर केलेत त्यावरून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर आर्थिक कसरत करावी लागणार आहे त्याच काय ? याची उत्तर कशी सरकार देणार.

 

लसी वरून राजकारण केलंत व अखेर जाहिर ही केलेत . मात्र ही लस सर्वांपर्यंत कशी पोहोचणार ? मोफत लस देण्याचा आर्थिक नियोजन कसं करणार याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्पष्टीकरण देत नियोजन कस आहे याची घोषणा करावी . अशी विरोधी पक्ष भाजप म्हणून आम्ही मागणी करत आहोत. अतुल भातखळकर ,भाजप प्रवक्ते, आमदार

@@AUTHORINFO_V1@@