देशवासीयांसाठी धावून आली 'सेवा इंटरनॅशनल'

    दिनांक  27-Apr-2021 20:02:01
|
india _1  H x W


मुंबई : देशातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता आता जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कठीण काळात ज्यांच्यासाठी भारत धावून घेला त्या सर्वांनी भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी 'सेवा इंटरनॅशनल' या संस्थेने जगभरातून भारतीयांसाठी मदत मिळवण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केल्याची माहिती संस्थेचे वैश्विक संयोयक श्याम परांडे यांनी दिली आहे. दैनिक 'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री उशीरापर्यंत ही मदत भारतात पोहोचवण्यात येणार आहे. देशात जाणवत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे ही मदत उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युरोप, अमेरिका आणि युएईतील भारतीय वंशाच्या नागरिकांतर्फे ही मदत उभी केली जाणार आहे. ४ हजार ऑक्सिजन कंसेंट्रेटर, २० व्हेंटीलेटर्स आणि इतर आवश्यक सामग्री मागविली जाणार आहे. तसेच एकूण १० हजार ऑक्सिमीटर रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती परांडे यांनी दिली आहे.
 
 
हेल्प इंडिया डिफीट कोविड-१९ मोहिम
 
देशभरातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय शोधण्यासाठी संस्था स्वयंसेवकांनी 'हेल्प इंडिया डिफीट कोविड-१९' ही मोहिम सुरू केली आहे. देशातील १० हजार कुटूंबांपर्यंत व हजार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत खाद्यपदार्थ पुरवणार आहे. तसेच एकूण ५० लाख डॉलर्सची मदत उभी करण्याचे ध्येय ठेवले आहे. आत्तापर्यंत ही मदत १५ लाखांपर्यंत जमा झाली आहे. ५० लाख रुपयांचे उद्दीष्ट्य संस्थेने पुढे ठेवले आहे.
 
 
टेलिमेडीसीन सेवा उपलब्ध
 
होम क्वारंटाईन किंवा सहव्याधी असणाऱ्या रुग्णांसाठी स्थानिक भाषांमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सोयही संस्थेतर्फे करून देण्यात येईल. लॉकडाऊनमध्ये रुग्णांवर येणारा ताण तणाव आणि भीती दूर करण्यासाठी समुपदेशन करण्याची सोयही संस्थेमार्फत उपलब्ध केली जात आहे.
 
'सेवा इंटरनॅशनल' काय करते ?
 
ज्या ज्या वेळी देश संकटात असेल तेव्हा आपल्या माणसांसाठी उभे राहण्याचे काम ही संस्था गेल्या २५ वर्षांहून अधिक काळासाठी करत आहे. केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या संकटांसाठीही ही संस्था मदतीसाठी सदैव तत्पर असते. जगभरातील २५ देशांमध्ये घट्ट पाळेमुळे रोवलेल्या या संस्थेने तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना इथल्या भारतीय जोडून ठेवण्याचे काम अविरत करत आली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.