सिंधुदुर्गातील खासगी रुग्णालयातही मिळणार मोफत लस

    दिनांक  01-Mar-2021 16:31:11
|
BJP_1  H x W: 0कणकवली : देशात आजपासून ६० वर्षीयवरील आणि पूर्वीपासून दीर्घकालीन आजार असणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तींना कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. कोकणातील नागरिकांना आता खासगी रुग्णालयातही मोफत लस मिळणार आहे. त्यासाठी आकारले जाणारे अडीचशे रुपये भरण्याची व्यवस्था राणे यांनी केली आहे.
 
 
 
ते म्हणाले, "माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील ६० वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस खासगी रुग्णालयातूनही विनामुल्य देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. प्रत्येकाला सुरक्षित आणि निरोगी आयुष्य मिळावे हे आमचे ध्येय आहे.
 
 
ज्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही. अशांना आमच्या मतदारसंघातून मिनी बस सेवा तीन तालुक्यांमध्ये सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी 7875310086 / 9960403215 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.