टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणासह १५० शाखांचा टप्पा पूर्ण केला.

    14-May-2025
Total Views |

TJSB Bank Limited completed the milestone of 150 branches with the merger of Sawantwadi Bank
सावंतवाडी: ( TJSB Bank Limited completed the milestone of 150 branches with the merger of Sawantwadi Bank ) टीजेएसबी सहकारी बँकेने सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या यशस्वी विलीनीकरणासह तिच्या १५० व्या शाखेचे भव्य उद्घाटन करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे बँकेची सेवा क्षमता अधिक बळकट झाली असून, वाढत्या ग्राहकवर्गासाठी अधिकाधिक मूल्यवर्धित सेवा पुरवण्याची तयारी बँकेने केली आहे.
 
या विलीनीकरण प्रक्रियेची अंमलबजावणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली असून, सहकारी बँकिंग क्षेत्राच्या मजबुतीसाठी रिझर्व्ह बँकेने सुचवलेले धोरणात्मक उपाय म्हणून हे विलीनीकरण केले गेले. रिझर्व्ह बँकेने दिनांक ९ मे २०२५ रोजी आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषणा केली होती. टीजेएसबी सहकारी बँकेने पाच राज्यांतील पारदर्शक व परिणामकारक बँकिंग कार्यपद्धतीच्या जोरावर हे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे.
संपूर्ण नियामक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व नऊ शाखा मंगळवार, दिनांक १३ मे २०२५ पासून टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे टीजेएसबी बँकेच्या शाखांची संख्या १४९ वरून १५८ पर्यंत वाढली आहे. यामध्ये सावंतवाडी येथील मुख्य शाखेचे उद्घाटन टीजेएसबी बँकेच्या १५०व्या शाखा म्हणून करण्यात आले. यासोबतच सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील सर्व कर्मचारी टीजेएसबी बँकेत पूर्णतः समाविष्ट झाले आहेत.
 
प्रमुख नेतृत्वांचे विचार –
 
शरद गांगल, अध्यक्ष, टीजेएसबी सहकारी बँक यांनी सांगितले, “हे विलीनीकरण हा केवळ विस्तार नाही, तर आम्ही को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक व्यापक करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण विभागातील आमचा विस्तार आता अधिक बळकट झाला आहे. या भागातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांना उत्तम बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा टप्पा आम्हाला सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या दिशेने पुढे नेणारा आहे.”
निखिल आरेकर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, टीजेएसबी सहकारी बँक म्हणाले, “आम्ही कायम सर्व भागधारकांच्या हितासाठी शाश्वत वाढीवर विश्वास ठेवतो. सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणामुळे आमचा को-ऑपरेटिव्ह बँकिंग नेटवर्क अधिक मजबूत झाला आहे. आमचा उद्देश आहे की, ग्राहकांना उत्तम बँकिंग अनुभव देताना, अर्थिक स्थैर्य व सुविधा यांचे संतुलन राखले जावे.”
 
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे विचार –
 
सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री व प्रमुख पाहुणे म्हणाले, “सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे टीजेएसबी सहकारी बँकेत विलीनीकरण हा प्रशंसनीय उपक्रम आहे. अशा विलीनीकरणामुळे दर्जेदार बँकिंग सेवा दूरदराज भागांपर्यंत पोहोचतात. यामुळे आर्थिक समावेशाला चालना मिळेल, स्थानिक ग्राहकांना मजबूत आर्थिक पर्याय मिळतील व सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर बनेल. टीजेएसबी बँकेला या पुढाकाराबद्दल हार्दिक शुभेच्छा.”
 
दीपक केसरकर, आमदार व विशेष अतिथी यांनी सांगितले, “या विलीनीकरणामुळे सिंधुदुर्ग विभागातील आर्थिक पायाभूत सुविधेला बळ मिळणार आहे. टीजेएसबी बँकेचे व्यापक नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञान व ग्राहककेंद्रित सेवा स्थानिक उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा देईल. हे पाऊल आर्थिक समृद्धीकडे जाणारा मार्ग ठरेल.”
 
टीजेएसबी सहकारी बँकेबद्दल माहिती –
 
टीजेएसबी सहकारी बँक ही देशातील आघाडीची सहकारी बँक असून, १९७२ साली स्थापन झालेली ही बँक आज पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश – कार्यरत आहे. एप्रिल २०२५ अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय रु. २३,१०५ कोटींवर पोहोचला असून, त्यापैकी रु. ८,२५६ कोटी हे कर्जवाटप व रु. १४,८४९ कोटी ठेवी आहेत. बँकेने आपल्या पारदर्शक व ग्राहककेंद्रित कार्यपद्धतीच्या जोरावर सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे.
 
टीजेएसबी सहकारी बँक ही देशातील आघाडीची सहकारी बँक असून, १९७२ साली स्थापन झालेली ही बँक आज पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश – कार्यरत आहे. एप्रिल २०२५ अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय रु. २३,१०५ कोटींवर पोहोचला असून, त्यापैकी रु. ८,२५६ कोटी हे कर्जवाटप व रु. १४,८४९ कोटी ठेवी आहेत. बँकेने आपल्या पारदर्शक व ग्राहककेंद्रित कार्यपद्धतीच्या जोरावर सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे.