कुडाळ येथे भाजपची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न!

    03-Apr-2024
Total Views |

Nitesh Rane 
 
सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, "गेली अडीच वर्षे पक्ष संघटनेत झोकून केलेल्या कामाची रिजल्ट देण्याची वेळ आता आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. या दृष्टीने सुपर वॉरियर म्हणून आपल्या समोरील उद्दिष्ट गाठण्यासाठी मतदान वाढवण्यासाठी रणनिती करा," असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, लोकसभा क्लस्टर प्रमुख अतुल काळसेकर, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.