कोकणातील कात व्यावसायिकांच्या समस्या सरकार सोडवणार

    04-Aug-2023
Total Views | 69

sudhir


मुंबई : कात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत विधानभवनात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
 
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कात उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच यासंदर्भात विविध पैलूंचा अभ्यास करून मार्ग सुचविण्याकरीता दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठित करणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
 
मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी यांच्यासह काही वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले की, कात व्यावसायिकांच्या अडचणींची शासनाला जाणीव असून त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात येईल. या समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा.
तसेच पुढे ते म्हणाले की, खैर वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहन देण्याबाबतचाही अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासाकरिता श्री. भंडारी यांनी मदत करावी, अशी सूचनाही मंत्री मुनगंटीवार यांनी केली. तसेच यावेळी कात व्यावसायिकांतर्फे आमदार श्री. गोगावले, श्री. निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री. भंडारी यांनीही विविध सूचना केल्या.

अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121