कुकसह सुशांतचा मोबाईल, लॅपटॉप सीबीआयच्या ताब्यात!

    दिनांक  21-Aug-2020 14:06:40
|
sushant_1  H x

सुशांत प्रकरणी सीबीआय पथक पहिल्याच दिवशी ‘अॅक्शन’ मोडवर!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने आपले काम सुरू केले आहे. सीबीआयच्या एका पथकाने वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या कार्यालयात तासभर थांबून कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर हे पथक वांद्रा पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. यापूर्वी सीबीआयने सुशांतचा कुक नीरज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीबीआयचे अधिकारी ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत, तिथेच या एजन्सीची एक टीम नीरजची चौकशी करत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या आधी नीरजने त्याला ज्युस दिला होता.


सीबीआयने दोन टीममध्ये विभागणी केली आहे. यातील एक टीमने वांद्रे पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्यांनी सुशांतची डायरी आणि इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहे. तसेच सुशांतचा फोन आणि लॅपटॉपही ताब्यात घेतले आहेत. यातील एक टीम ही एसपी अनिल यादव लीड करत असून वांद्रे पोलीस ठाण्यात तपास करत आहे. तर दुसरी टीम ही एसपी नुपूर यादव लीड करत आहे. ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करणार आहे.


त्याशिवाय सीबीआयच्या टीमने सुशांतच्या मृत्यूदिवशी घटनास्थळी उपस्थिती असलेल्या सर्व साक्षीदारांना बोलवलं आहे. तसेच सुशांतच्या रुमचा दरवाजा उघणाऱ्या व्यक्तीलाही बोलवण्यात आले आहे. रिया आणि तिच्या कुटूंबाची चौकशी केली जाणार आहे, परंतु ही चौकशी आज होईल की नाही, हे स्पष्ट नाही.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.