मुंबईत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |

mumbai corona_1 &nbs


मुंबई
: मुंबईतील कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून रोजची कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतेच आहे. मागील आठवड्यात १० ते १६ मे या कालावधीत ५,७०७ रुग्ण सापडले. त्या आधीच्या आठवड्यात (३ ते ९ मे) ४,५१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.याचाच अर्थ मागील दोन आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सुमारे १०००अधिक रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.



मुंबईत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या शनिवारपर्यंत १८,३९६ होती. त्यापैकी मागील एक आठवड्यात ५७०७ रुग्ण सापडले. एकूण ४८०६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी मागील आठवड्यातच २०१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण ६९६  जणांचा मृत्यू झाला असून, मागील आठवड्यात २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोना बाधित मोठ्या संख्येने सापडत असून रविवारी (१७ मे) तर १५७१ रुग्ण सापडले. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असली तरी पालिका प्रशासनाची आणि खास करून आरोग्य विभागाची विशेष तारांबळ उडाली आहे.



मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळताच मुंबई महापालिका व राज्य सरकार सावध झाले होते. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागातील डाॅक्टर परिचारिकांसह अन्य कामगार युध्दपातळीवर काम करत आहेत. कोरोनाचा रुग्ण आलाच तर तो ठिक होऊनच घरी जावा या उद्देशाने आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. तरीही दिवसागणिक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.



वरळी पाठोपाठ धारावी कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला आहे. नवे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सूत्रे हाती घेताच धारावीला भेट दिली. तेथील सहाय्यक आयुक्त दिघावकर तर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पण धारावीत कोरोनाचा कहर चालूच आहे. शनिवरपर्यंत धारावीत ११९८ रुग्ण सापडले असून, ५३ जण दगावले आहेत. धारावीची रुग्णसंख्या आटोक्यात आणणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. खरे पाहता कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. या विषाणूशी लढा देताना महासत्ता सुद्धा जेरीस आले आहेत. त्यामानाने दाट वस्तीच्या मुंबईत पालिका प्रशासनाने कोरोनाला थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.इकबालसिंग चहल यांची सूत्रे हाती घेताच नायर रुग्णालयाबरोबरच धारावीला भेट दिली. अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांनी कोरोनाला काबूत आणण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे. परंतु कोरोनाने त्यांना दाद दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी आरोग्यतज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांचा अंदाज खरा ठरत आहे. संपूर्ण मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली असून मे अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



आठवड्यातील कोरोना कहर
------------------------------------
दिनांक......बाधित......बरे......मृत्यू
-------------------------------------
१० मे......८७५......२१२......१९
११ मे......७१९......१०६......२०
१२ मे......४२६......२०३......२८
१३ मे......८००......४७८......४०
१४ मे......९९८......४४३......२५
१५ मे......९३३......३३४......३४
१६ मे......८८४......२३८......४१
---------------------------------------
एकूण......५७०७......२०१४.....२०७
@@AUTHORINFO_V1@@