पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांसह भारतीयांनी वाहिली पुलवामा हुतात्म्यांना श्रद्धांजली

    दिनांक  14-Feb-2020 10:12:37

pulwama_1  H x
 
 
नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतमातेचे ४४ जवान हुतात्मा झाले. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झाले. हल्ल्यांमध्ये विरमरण आलेल्या जवानांच्या स्मरणार्थ लेथपोरा भागातील कँम्पमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. शुक्रवारी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
 
 
 
 
 
"गेल्या वर्षी झालेल्या पुलवामा हल्ल्यामध्ये वीरमरण हुतात्म्यांना श्रद्धांजली. ते असाधारण व्यक्ती होते ज्यांनी स्वतःचे जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. त्यांचे हुतात्म्य भारत कधीही विसरणार नाही." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.
  
 
 
 
 
 
"मी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या मातृभूमीच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या देशाच्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारत नेहमीच आभारी राहील." असे ट्विट गृह मंत्री अमित शहा यांनी केले आहे.
 
 
 
 
"२०१९च्या भ्याड पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्म्य आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचे स्मरण करत आहे. भारत कधीही त्यांचे बलिदान विसरणार नाही. संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजूटरित्या उभा आहे आणि आमची ही लढाई सुरूच राहणार आहे." असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे.