स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

    दिनांक  04-Jan-2020 21:08:51
|
Public protests by Congre


पनवेल : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पुस्तकात आक्षेपार्ह्य मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचा शनिवारी सर्व स्तरांतून जाहीर निषेध करण्यात आला. सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी सावरकरप्रेमींनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यांवरतरून निदर्शने केली. वसई येथे भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत काँग्रेसच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली, तर पनवेलमध्येही नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदवला.

 

पनवेलमध्ये भाजपची निदर्शने

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून बदनामीचा प्रयत्न करणार्या काँग्रेस विरोधात शनिवार, दि. ०४ जानेवारी रोजी पनवेल भाजपच्यावतीने निदर्शने करीत जाहीर निषेध करण्यात आलाशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निषेध कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, विश्वनाथ कोळी, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे, संजय भोपी, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, सुशिला घरत, माजी नगरसेवक जगदीश गायकर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पंचायत समिती सदस्य राज पाटील, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, स्वाती कोळी, नीलिमा वैती, संजय जैन, चंद्रकांत मंजुळे, विजय म्हात्रे, रमेश नायर,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर दोनवेळा जन्मठेप भोगणारे एकमेव स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याचे षड्यंत्र काँग्रेसकडून अद्याप सुरूच आहे. विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यामधील संबंधांबाबत आपल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करत स्वातंत्र्यवीरांची बदनामी करण्याचे दुःसाहस काँग्रेसने पुन्हा एकदा केले आहे. काँग्रेसच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत असून याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली.

 

मध्य प्रदेश राज्यात सध्या काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. भोपाळ येथील काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ’वीर सावरकर कितने वीर ?’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. सावरकरांविषयी लिहिलेल्या या पुस्तकात सावरकर आणि गोडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यांची नाहक बदनामी करण्यात आली. अत्यंत वाईट शब्दांत याबाबत लिखाण करण्यात आल्यानंतर सावरकरप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत असून काँग्रेसच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे डोके ठिकाणावर नसल्यानेच ते अशा प्रकारचे षड्यंत्र रचत असल्याची टीका करत काँग्रेसच्या या राष्ट्रविरोधी षड्यंत्राचा यावेळी जोरदारपणे निषेध करण्यात आला.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.