'परेड'च्या पडद्यामागे...

    25-Nov-2019   
Total Views | 254


 


रविवारच्या ‘प्राइड परेड’मध्ये सहभागी झालेल्यांनी काश्मिरचा मुद्दा उचलत, ‘कश्मिर माॅंगे आजादी’, ‘तुम कुछ भी कर लो, तुम पुलिस बुला लो, हम लड के लेंगे संघवाद से, पितृसत्ता से... आजादी’ यांसारख्या घोषणा दिल्या. इतकेच नव्हे तर थेट ज्या भूमीत जन्मलो, जिला आपण माता मानतो, त्या भारतमातेबद्दलही बेशरम शब्द वापरले. ‘भारतमाता को चाहिए गर्लफ्रेंड’ असे लिहिलेले फलक या ‘प्राइड परेड’मध्ये झळकावले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अश्लील पोस्टर आणि भगवा रंग द्वेषाचा असल्याचेही म्हटले.


परकीयांनी अपरिमित आक्रमणे केलेला आणि इथल्या मातीतल्याच जयचंदी प्रवृत्तींनी स्वदेश सुरक्षेला सुरुंग लावलेला जगाच्या पाठीवर भारतासारखा दुसरा देश नसेल. ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंत त्याची कितीतरी उदाहरणे आपल्याला ग्रंथांतून, पुस्तकातून वाचायला, पाहायला मिळतील. आधुनिक युगात भारताच्या फाळणीनंतर पाकिस्ताननेदेखील सातत्याने तेच केले आणि भारताशी युद्ध पुकारले. तसेच भारतातल्याच विघातक मानसिकतेच्या लोकांनी पाकिस्तानला-दहशतवाद्यांना साथ दिली. पाकिस्तानची आणि दहशतवाद्यांची तळी उचलणारे हे लोक आजही उजळ माथ्याने उत्तर-दक्षिण पसरलेल्या भारतात मूठभर संख्येने का होईना दिसतातच. अर्थात त्यांना पाठिंबा वा समर्थन मिळत नाहीच, पण तरीही थोड्याशा संख्येत का होईना, ते अस्तित्वात असतात, हे संतापजनक. अफझल गुरू, अजमल कसाब, याकूब मेमन, बुर्‍हान वाणी आदी प्रकरणांत ही मंडळी उघडपणे समोर आली होती. विविध प्रकारच्या संस्था, संघटना जन्माला घालून, पांढरपेशे मुखवटे पांघरून त्यांची ही काळी कृत्ये चालतात. जम्मू-काश्मीरला लागू असलेल्या 'कलम ३७०'ची गठडी वळल्यानंतर त्यांच्यातल्या काहींनी तोंड उघडले तर काही मनातल्या मनात तडफडत, चरफडत राहिले. पण, ऑगस्ट महिन्यात त्यांना झोंबलेल्या मिरच्यांचा धूर आजही निघत असून त्याचा दाखला नुकताच दिल्लीत अनुभवास आला.

 

रविवार दि. २४ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये समलैंगिकांनी 'प्राइड परेड'चे आयोजन केले होते. समलैंगिकांकडे आजही काहीशा तुच्छतेच्या, हीनतेच्या आणि आपल्याहून कुणीतरी विचित्र या नजरेने सर्वसामान्य लोक पाहतात. तर तसे न होता समलैंगिकांच्या भावभावना समजून घेऊन त्यांनाही इतरांप्रमाणे सन्मानाचे, प्रतिष्ठेचे जिणे जगायला मिळावे, असा उद्देश सहसा अशा 'प्राइड परेड'मागे असतो. परंतु, दिल्लीतील समलैंगिकांच्या परेडमध्ये आक्रित घडले आणि तिथे देशविरोधी, अवमानकारक घोषणाबाजी केली गेली. ती अर्थातच कोणत्याही देशप्रेमी, देशभक्त, राष्ट्रवादी, राष्ट्रनिष्ठ व्यक्तीला चीड आणणारी होती. तसेच भारताच्या एकता-अखंडतेला चूड लावणारी होती. नुकतीच या 'प्राइड परेड'ची एक ध्वनिचित्रफित समोर आली असून समलैंगिकांनी-त्यात सामील झालेल्या लोकांनी दिलेले नारे, हाती घेतलेले फलक अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात. रविवारच्या 'प्राइड परेड'मध्ये सहभागी झालेल्यांनी काश्मीरचा मुद्दा उचलत 'कश्मीर माँगे आजादी', 'तुम कुछ भी कर लो, तुम पुलिस बुला लो, हम लड के लेंगे संघवाद से, पितृसत्ता से... आजादी' यांसारख्या घोषणा दिल्या. इतकेच नव्हे तर थेट ज्या भूमीत जन्मलो, जिला आपण माता मानतो, त्या भारतमातेबद्दलही बेशरम शब्द वापरले. 'भारतमाता को चाहिए गर्लफ्रेंड', असे लिहिलेले फलक या 'प्राइड परेड'मध्ये झळकावले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अश्लील पोस्टर आणि भगवा रंग द्वेषाचा असल्याचेही म्हटले.

 

समलैंगिकांच्या 'प्राइड परेड'मधील या घोषणा बघता कोणाच्याही मस्तकात तिडीक जाऊन ते धगधगू लागेल. पण, या परेडमध्ये जे सामील होते, त्यांच्या मानसिकतेचे काय? सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना मान्यता दिली. नंतर केंद्र सरकारने त्यासंबंधीचे विधेयकही आणले, पण त्यातील काही तरतुदींचा समलैंगिक समुदायाने विरोध केला. कदाचित सरकारचे बरोबर असेल किंवा समलैंगिक समुदायाचेही बरोबर असेल, विरोधाचा मुद्दाही रास्त असेल. परंतु, या सगळ्यामध्ये भारतमातेचा आणि जम्मू-काश्मीरचा मुद्दा कुठून आला? तुम्हाला सरकारविरोधात लढायचे असेल तर लढा, पण त्यात आपण जिच्या अंगाखांद्यावर वाढलो, जिथल्या अन्नधान्य व नैसर्गिक साधनसंपत्तीने धष्टपुष्ट झालो, त्या भारतमातेचाच अपमान का करायचा? जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग असल्याचे केवळ आपणच नव्हे तर अवघ्या जगाने सांगितले तरी समलैंगिकांनी त्याच्या 'आझादी'साठी आरोळ्या का मारायच्या? की समलैंगिकांच्या 'प्राइड परेड'च्या माध्यमातून दुसरेच कोणीतरी आपला अजेंडा राबवत होते? समलैंगिक व त्यांच्या संघटनांनीही त्यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे का? नसेल तर मग त्यांनी प्राइड परेडमधून अशा कुटील-कारस्थान्यांना हाकलून लावले का? तर नाहीच. तसेच यामध्ये पाकिस्तानचा वा अन्य कुठल्या देशाचा, संस्थेचा हात आहे का? याचा तपास मात्र केला पाहिजे.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
युपीएचा दहशतवाद्यांशी ‘गुप्त सौदा’ - भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

युपीएचा दहशतवाद्यांशी ‘गुप्त सौदा’ - भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख व सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दहशतवादी यासीन मलिक याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मलिकने दिल्लीतल्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हलफनाम्यात असा दावा केला आहे की, 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्याने लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक व 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याची भेट घेतली होती. या भेटीबद्दल त्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांना प्रत्यक्ष माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121