मेट्रो ३ला बेस्ट देणार लास्ट माईल कनेक्टिव्हीटी

- ३२ बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा बेस्टचा प्रस्ताव

    09-May-2025
Total Views | 12
 
Metro 3 & mumbai BEST connectivity
 
मुंबई: ( Metro 3 & mumbai BEST connectivity ) मुंबई मेट्रो-३ कुलाबा-बीकेसी-आरेच्या दुसऱ्या टप्प्याची सेवा लवकरच सुरू होणार असून, या मार्गाला अंतिम टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट(बेस्ट)ने ३२ बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
 
या योजनेत १३ मार्गांवर सेवा वाढवणे (464 फेऱ्या), 6 मार्गांचा मार्ग बदल (264 फेऱ्या), ३ मार्गांचा विस्तार (78 फेऱ्या) आणि १० मार्गांवर कपात (435 फेऱ्या) यांचा समावेश आहे. एकूण 1,241 फेऱ्यांचा हा बदल प्रवाशांचा सरासरी प्रतीक्षा वेळ १५ मिनिटांपर्यंत कमी करेल, असा अंदाज आहे.
आढावा बैठकीदरम्यान बेस्टने ‘एक्वा लाइन’ म्हणूनही ओळखल्या जाणारी मुंबई मेट्रो लाइन-3 (कोलाबा-बीकेसी-आरे) पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर बस मार्ग सुसूत्रीकरणाची रणनीती सादर केली.
 
गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. सध्या बेस्ट २,८०० बसांचा ताफा चालवते आणि मुंबई तसेच आसपासच्या परिसरात दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देते.
मेट्रो-3 चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार
मुंबई मेट्रो लाइन-3 मार्गाचा दुसरा टप्पा (बीकेसी ते वरळी नाका) लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर अंतिम टप्पा (कफ परेड) येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे (आरे जेव्हीएलआर ते बीकेसी) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये केले होते, त्यानंतर आता दुसरा टप्पा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

(Eggs Thrown At ISKCON Rath Yatra In Toronto Canada) कॅनडाच्या टोरंटोमध्ये काढलेल्या इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्या महिलेने केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121