महाराष्ट्रातून एका रात्रीत गाठा प्रयागराज

मध्य रेल्वे कुंभमेळा-२०२५ विशेष सेवा : महाराष्ट्रातून धावणार अतिरिक्त महाकुंभ विशेष रेल्वे

    06-Feb-2025
Total Views | 39

kumbhmela


मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
उत्तर प्रदेशमधील महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या आठ विशेष सेवा धावणार आहे. प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या कुंभमेळा- २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बनारस तसेच नागपूर आणि दानापूर दरम्यान ८ अतिरिक्त विशेष सेवा चालवणार आहे. कुंभमेळा विशेषचे सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कुंभमेळा विशेष

लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कुंभमेळा विशेष सेवा चालविण्यात येतील. ०१०३१ ही कुंभमेळा विशेष दि.८ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०६.४५ वाजता पोहोचेल. तर परतीची ०१०३२ कुंभमेळा विशेष ट्रेन दि. ०६ फेब्रुवारी आणि दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.४० वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर आणि चुनार इत्यादी थांबे देण्यात येतील.

 नागपूर - दानापूर कुंभमेळा विशेष

ट्रेन क्रमांक ०१२०३ कुंभमेळा विशेष ट्रेन दि ०८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता दानापूर येथे पोहोचेल. तर परतीची सेवा देणारी ०१२०४ ही कुंभमेळा विशेष ट्रेन दि.०९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता पोहोचेल. या ट्रेनला गोंदिया, बालाघाट, नैनपूर, घानसोर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा ई. थम्बई देण्यात येतील.
अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121