नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Assembly Election) ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधीच एग्झिट पोलने दिल्लीमध्ये कमळ फुलून भाजप विजयी होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भाजप २७ वर्षींनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्तेत येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आम आदपी पक्षाच्या विजयाची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान काँग्रेसचे मुश्कीलीने खाते खुलले जाणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये चुरस निर्माण झाली. त्यामध्ये भाजप ३५-४० जागांवर विजयी मिळवणार आहे. तर आम आदमी पक्षाला ३२ ते ३७ जागांवर विजय मिळणार असून काँग्रेसला एकही जागेवर विजय मिळवता येणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोल वर्तवत आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी एक्झिट पोलनुसार भाजप स्पष्ट बहुमताने विजयी होईल. आप २५ ते २८ जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवण्या येत आहे. तर भाजप ३९ ते ४४ जागांवर विजयी मिळवेल असा अंदाज चाणक्य स्टॅटर्जीने वर्तवला आहे. काँग्रेसला २-३ जागा मिळवण्याची शक्यता चाणक्य स्टॅटर्जीने वर्तवली.
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार आपचा पराभव निश्चत असल्याचा अंदाज आहे. आपला १८-२५ जागा मिळू शकतात असे सांगण्यात येत आहे. तर भाजपला ४२-५० जागा मिळू शकतात. काँग्रेसला ०-२ जागा मिळवणार असल्याचा अंदाज आहे. तर पीपल्स इनसाइटनुसार भाजपला ४० ते ४४ जागांवर विजयी मिळू शकतो. आपला २५ ते २९ जागांवर विजयी मिळवता येणार असल्याचा अंदाज आहे.
पी-मार्कच्या पोलमध्ये भाजप सर्वाधिक म्हणजेच ३९-४९ जागांवर विजयी मिळवेल. तर आपला २१-३१ जागांवर विजयी मिळवता येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान डबल इंजिन सरकार विजयी होणार असल्याचा अंदाज बहुतांश पोल्सने वर्तवला आहे. या पोलमधून कांग्रेसची हातचलाखी दिल्लीत कामाची नसणार आहे. तर आपपासून दिल्ली दूर राहणार असल्याचा अंदाज आहे.