हिंदू संस्कृतीवर टीका करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी डाव्या कंपूची असते. त्यासाठी ते खोटी माहितीदेखील इतिहास म्हणून बेदरकारपणे प्रसिद्ध करतात आणि त्यांची इकोसिस्टम त्यांची लगेचच री ओढते. मात्र, आता जनता जागृत झाली आहे, डाव्यांच्या प्रत्येक आरोपाला संदर्भासहित उत्तर दिले जात आहे. महाकुंभबाबतही डाव्या इकोसिस्टीमने असेच अपप्रचाराचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात ते यंदा सपशेल अपयशी ठरले.
डाव्या परिसंस्थेने खोटे विमर्श रचण्यात आपली क्षमता दाखवली आहे. विशेषतः हिंदू धर्म आणि संस्कृतीविरुद्ध. एका व्हिडिओमध्ये, महाराष्ट्रातील पत्रकार निरंजन टकले हे अकबराच्या वैभवाचा प्रचार करतात आणि असा दावा करतात की, कुंभमेळ्याची स्थापना त्यानेच केली होती. ऐतिहासिक तथ्ये विकृत करणे, वैज्ञानिक सत्यांचे अज्ञान किंवा तार्किक भ्रम आणि ऍड होमिनम युक्तिवाद, ही डाव्या परिसंस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. केवळ स्वार्थी हेतूने विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी, खोटा विमर्श मांडणे मानवतेच्या विरुद्ध आहे. डाव्यांनी मांडलेले हिंदू सणांबद्दलचे खोटे विमर्श, खोटे इतिहासकार आणि त्यांचे खोटे सिद्धांत जसे की, ‘आर्य आक्रमण सिद्धांत’, रामायण, महाभारत इत्यादींवर खोटे कथन सर्व पुराव्यानिशी खोडून टाकले जात आहेत. डाव्या इतिहासकारांनी हे समजून घेतले पाहिजे की, त्यांच्या प्रत्येक खोट्या विमर्शाला आता, संदर्भांसह उत्तर दिले जात आहे. कुंभमेळ्याची सुरुवात अकबराने केली होती हे असेच एक मिथक. ही मिथके दूर करण्यासाठी, मी येथे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल माहिती देत आहे. बहुतेक हिंदू सणांचे गहन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थ आहेत, जे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
प्राचीन उत्पत्ती आणि प्रारंभिक संदर्भ : युगानुयुगे कुंभमेळा
ऋग्वेद आणि पाली धर्मग्रंथ : प्रारंभिक उल्लेख
ऋग्वेदाला पूरक असलेल्या ऋग्वेद परिशिष्टात, प्रथम कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान प्रयागचा उल्लेख आहे. बौद्ध धर्माच्या पाली धर्मग्रंथांप्रमाणे हे प्राचीन वैदिक साहित्य, प्रयाग येथील पवित्र संगमावर स्नान करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. हे संदर्भ तीर्थयात्रा आणि धार्मिक स्नान आणि उत्सवाच्या दीर्घकालीन इतिहासावर भर देतात.
महाभारत आणि पुराणिक संदर्भ
भारताच्या महान महाकाव्यांपैकी एक असलेले महाभारत, भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्यात प्रयाग स्नान तीर्थयात्रेला प्रायश्चित्त आणि शुद्धीकरण म्हणून चित्रित करण्यात आले आहे. ही परंपरा, प्राचीन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीत घट्टपणे रुजलेली होती. महाभारत आणि इतर पौराणिक लेखनातील हे संकेत, कुंभमेळ्याला आकार देणार्या सुरुवातीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये अंतर्दृष्टी देतात.
पुराणात कुंभाचे तपशीलवार वर्णन आहे
स्कंद पुराण आणि पद्म पुराणातही असेच वर्णन आढळते. पद्म पुराणात म्हटले आहे, “पृथिव्यां कुम्भयोगस्य चतुर्धा भेद उच्चते। चतु:स्थले नितनात् सुधा कुम्भस्थ भूतले॥ चन्द्र प्रस्रवणा रक्षां सूर्यों विस्फोटनात् दधौ। दैत्येभ्यश्च गुरु रक्षां सौरिदेवेंद्रजात् भयात्॥” याचा अर्थ, पृथ्वीवर कुंभयोगाचे चार प्रकार आहेत. अमृत चार ठिकाणी वाहते. येथे, संरक्षण सूर्य आणि चंद्राद्वारे मिळते. कुंभाबद्दल स्कंद पुराणात म्हटले आहे, “माघे मासे गंगे स्नानं यः कुरुते नरः। युगकोटिसहस्राणि तिष्ठंति पितृदेवताः॥” म्हणजे माघ महिन्यात, गंगा स्नान करणार्या व्यक्तीचे पूर्वज स्वर्गात वास करतात. तर पद्मपुराणात म्हटले आहे की, “त्रिषु स्थलेषु यः स्नायात् प्रयागे च पुष्करे। कुरुक्षेत्रे च धर्मात्मा स याति परमं पदम्॥” याचा अर्थ, प्रयाग, पुष्कर आणि कुरुक्षेत्र येथे स्नान करणारा सत्पुरुष परमधामला जातो.
गरुड पुराणात म्हटले आहे, “अग्निष्टोमसहस्राणि वाजपेयशतानि च। कुंभस्नानस्य कलां नार्हंते षोडशीमपि॥ याचा अर्थ, हजारो अग्निस्तोमा आणि शेकडो वाजपेयी, यज्ञ कुंभस्नानाच्या सोळाव्या भागाच्या बरोबरीचेही नसतात. ब्रह्म-वैवर्त पुराणानुसार, “प्रयागे माघमासे तु स्नात्वा पार्थिवमर्दनः। सर्वपापैः प्रमुच्येत पितृभिः सह मोदते॥” म्हणजेच, माघ महिन्यात प्रयागात स्नान केल्याने, सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पितृ प्रसन्न होतात. अग्नी पुराणानुसार, “कुंभे कुंभोद्भवः स्नात्वा प्रायच्छति हि मानवान्। ततः परं न पापानि तिष्ठन्ति शुभकर्मणाम्॥” म्हणजेच, कुंभ राशीत स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सत्कर्माकडे नेले जाते. विष्णु पुराणानुसार, “अयं कुंभः परं पुण्यं स्नानं येन कृतं शुभम्। सर्वपापक्षयं याति गच्छते विष्णुसन्निधिम्॥” म्हणजे, कुंभातील स्नान अत्यंत पुण्य देणारे आहे आणि यामुळे मनुष्य विष्णुलोकात जातो.
दरम्यान श्रीमद् भागवत पुराण म्हणते, “तत्रापि यः स्नानकृत् पुण्यकाले। गंगा जलं तीर्थमथाधिवासम्॥ पुण्यं लभेत् कृतकृत्यः स गत्वा। वैकुण्ठलोकं परमं समेति॥” म्हणजेच, जो मनुष्य पवित्र काळात गंगेत स्नान करतो, तो पुण्य प्राप्त करून वैकुंठ धामला जातो. महाभारताच्या वनपर्वात म्हटले आहे, “त्रिपुरं दहते यज्ञः स्नानं तीर्थे तु दहते। सर्वपापं च तीर्थे स्नात्वा सर्वं भवति शुद्धये॥” याचा अर्थ असा की, यज्ञ तिन्ही लोकांचे शुद्धीकरण करतो. परंतु, तीर्थात स्नान केल्याने, सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्ती पूर्णपणे शुद्ध होते. कुर्म पुराणात असे म्हटले आहे की, कुंभात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. कुंभमेळ्यातील स्नान पापे नष्ट होऊन ते फलदायी होतेे. तसेच, त्यावेळी पाप न करण्याचीही प्रतिज्ञाही करावी.
झुआनझांग यांची (सातवे शतक) निरीक्षणे
चिनी बौद्ध यात्रेकरू झुआनझांग यांचा सातव्या शतकातील अहवाल हा, कुंभमेळ्याच्या सर्वात प्राचीन ऐतिहासिक इतिहासांपैकी एक आहे. प्रयाग या हिंदू शहराचे त्यांनी केलेले वर्णन, त्यातील असंख्य मंदिरे आणि नदीच्या संगमावर स्नान करणे यांसारख्या धार्मिक प्रथा, उत्सवाच्या सुरुवातीच्या इतिहासात महत्त्वाची माहिती प्रदान करतात. त्यांचे निरीक्षण असे सूचित करते की, प्रयाग एक भरभराटीचे आध्यात्मिक केंद्र होते. या केंद्राने सर्व यात्रेकरू आणि धार्मिक साधकांना आकर्षित केले. हे सारे प्राचीन धर्मग्रंथ आणि भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात महाकुंभमेळ्याचे सखोल महत्त्व विशद करतात. बदलत्या काळाशी जुळवून घेत, या प्रचंड मोठ्या उत्सवाचे गेल्या काही दशकात विशाल स्वरूप झाले आहे.
तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’ आणि मुस्लीम इतिहासकारांचे वृत्तान्त
१६वे शतक हा महाकुंभमेळ्याच्या इतिहासातील एक निर्णायक कालखंड होता. तुलसीदासांनी लिहिलेले हिंदू महाकाव्य ‘रामचरितमानस’मध्ये प्रयागमध्ये होणार्या वार्षिक मेळ्याचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे. तसेच त्याच शतकातील मुस्लीम इतिहासकारांच्या ‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथातही, प्रयागचे वर्णन हिंदू तीर्थक्षेत्रांचा राजा असे केले आहे. यामुळे भारतातील विविध संस्कृतींमध्ये असलेली या उत्सवाची व्यापक ओळख आणि भक्ती अधोरिखित होते.
महाकुंभ मेळ्याचे काही वैज्ञानिक घटक :
कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित आहे. खगोलशास्त्रानुसार, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ हे, ग्रह आणि तारे एका विशिष्ट स्थितीत असताना आयोजित केले जातात. कुंभमेळ्याबद्दलचे पहिले लिखित ज्ञान चिनी प्रवासी ह्युएन त्सांगच्या प्रवासकथांमध्ये आढळले असले, तरी धार्मिक अभ्यासामध्ये ते विश्वाची सुरुवात मानले जाते.
महाकुंभमेळा हा एक असा उत्सव आहे ज्यामध्ये विज्ञान, ज्योतिष आणि अध्यात्म यांचा समन्वय दिसून येतो. महाकुंभाच्या तारखा वैज्ञानिक तंत्रांचा वापर करून ठरवल्या जातात. त्यापैकी बहुतेक ग्रहांच्या वेळेचा आणि स्थानांचा वापर करतात. जेव्हा गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशींमध्ये प्रवेश करतात आणि हे एकाच वेळी जुळून येते. या बदलाचे परिणाम पाणी, हवा आणि वातावरणावरही होतात. परिणामी, पवित्र प्रयागराज शहरात पूर्णपणे सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्या पवित्र ठिकाणी उपस्थित राहून गंगेत पवित्र स्नान केल्याने, आत्म्याला आध्यात्मिकरित्या प्रबुद्ध करता येते.
ज्योतिष : सूर्य, चंद्र आणि गुरू विशिष्ट स्थितीत असताना हा उत्सव साजरा केला जातो.
नद्यांचा संगम : हा कार्यक्रम नद्यांच्या संगमावर होतो. जिथे सौर चक्रात, विशिष्ट काळात अद्वितीय शक्ती कार्य करतात असे मानले जाते.
पाणी : जवळपास ७२ टक्के पाणी असलेल्या मानवी शरीराला, जलमार्गांच्या ऊर्जा मंथनाशी जोडल्याने त्या स्नानाचा फायदा होतो असे मानले जाते. महाकुंभमेळा हा संपूर्ण भारतातील लोकांचा एक मोठा मेळा आहे. जो पवित्र गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतो. हा मेळावा ज्ञानाने भरलेला आहे आणि त्यात असंख्य विधी आणि सांस्कृतिक उपक्रमही होतात.
निष्कर्ष : महाकुंभमेळ्याचा युगानुयुगे चाललेला प्रवास, त्याचे शाश्वत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवितो. पवित्र ग्रंथांमध्ये पहिल्यांदा उल्लेख झाल्यापासून, मध्ययुगीन आणि वसाहतवादी युगात आधुनिक अडचणींशी जुळवून घेणारा महाकुंभमेळा, हा भारताच्या आध्यात्मिक जीवनात एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सुसंवाद, शांती आणि भक्तीचे प्रतिनिधित्व करणारा महाकुंभमेळा, भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीच्या समृद्ध कलाकृती प्रतिबिंबित करणारा श्रद्धा आणि परंपरेचा एक दीपस्तंभ आहे.
(स्रोत: Mahakumbh.in आणि सुधीर गहलोत)