डिजिटल सोने खरेदीकडे भारतीयांचा कल; कमी जोखीम, सोन्याची शुद्धता आणि सुविधांवर भर!
07-Aug-2024
Total Views | 29
बेंगळुरू : कमी जोखीम, सोन्याची शुद्धता आणि डिसुविधांमुळे डिजिटल सोन्यात भारतीयांचा वाढला रस आहे, असे नावीतर्फे सर्वेक्षणात दिसून आला आहे. दरम्यान, 'डिजिटल गोल्ड' हा एक अनोखा पर्याय असून तो ग्राहकांना पारंपरिक मालमत्ता वर्गात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण स्वरूपात गुंतवणूक करण्याची संधी देतो. देशात डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य देण्यामागील मुख्य कारणांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
दरम्यान, सोने हा उत्तम परतावा असून त्यातच डिजिटल सोने चोरी होण्याची शक्यता नसल्याने ३९ टक्के लोकांना चिंता वाटत नाही. डिजिटल सोने माध्यमातून २४-कॅरेट शुद्ध सोने खरेदी करता येते. त्याचबरोबर, डिजिटल सोने घेण्याचा पर्याय देणाऱ्या ॲप्सद्वारे कधीही खरेदी, विक्रीची सोय २५ टक्के लोकांना पसंतीस उतरल्याचेही या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.
डिजिटल सोन्यात गुंतवणूक न करण्याची कारणे म्हणजे समभागांच्या तुलनेत कमी परतावा, ऑनलाइन फसवणुकीची भीती, डिजिटल किंवा भौतिक सोने खरेदी करताना जीएसटी आकारला जातो. या सर्व्हेक्षणात आर्थिक साक्षरता वाढवण्याची आणि सामान्य ग्राहकांच्या समस्या तसेच डिजिटल सोन्याच्या फायद्यांबद्दलचे प्रश्न सोडवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे ग्राहक डिजीटल सोने अधिक प्रमाणात खरेदी करत जातील, असा अंदाज आहे.