मराठा आणि कुणबी दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

    06-Aug-2024
Total Views | 57
 
Prakash Ambedkar & Bacchu Kadu
 
हिंगोली : मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. मराठा आणि कुणब्यांपासून सावध रहा, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.
 
बच्चू कडू म्हणाले की, "कुणबी, मराठ्यांपासून सावध राहा म्हणजे ते काही लुटारू किंवा दरोडेखोर आहेत का? हे प्रकाश आंबेडकरांनी सांगावं. कुठल्याही जातीवर अशाप्रकारचे वक्तव्य करणं योग्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्यांना योग्य स्थान दिलं आहे. पण प्रकाश आंबेडकर जेव्हा असं बोलतात तेव्हा खूप दु:ख वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असल्याचे ते म्हणतात. त्यामुळे त्यांना काही बोललं तर बाबासाहेबांचा अपमान होईल म्हणून आम्ही सावध राहतो," असेही ते म्हणाले. यावर कळत नसेल तर बोलू नये, असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे.
 
हे वाचलंत का? -  ...तर जरांगे शरद पवारांचाच माणूस यावर शिक्कामोर्तब होईल : प्रकाश आंबेडकर
 
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
 
"कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताच्या सभागृहात १९० कुणबी-मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त १८ आमदार ओबीसीचे आहे. कुणबी स्वत:ला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहात तो मी मराठ्यांबरोबर आहे असंच म्हणतो. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा," असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121