'सत्याग्रहाची १२० वर्षे आणि महात्मा गांधी' यावर कार्यशाळा

    17-Sep-2025
Total Views |

कल्याण,
 बी.के. बिर्ला महाविद्यालय येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानात गांधी अभ्यास केंद्र आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांची 'सत्याग्रहाची १२० वर्ष आणि महात्मा गांधी' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (सेवा निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ नरेश चंद्र उपस्थित होते. बिर्ला महाविद्यालयासोबत आर.के.टी. महाविद्यालय , के. जे. सौम्या कॉलेज, आर.एन. रुईया कॉलेज, स्वयंसिद्धी काॅलेज, भिवंडी आणि एस.एन.टी विश्वविद्यालय, आणि मुंबई विश्वविद्यालय यांच्या इतर महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

न्या. धर्माधिकारी यांनी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या तत्व आणि त्यांच्या जीवनातील अनेक घडणाबाबत माहिती देत तरुण पिढीला विचारशील होण्यास सांगितले. आजच्या तरुण पिढीच्या आक्रमक होण्याबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हणाले, आज केवळ भारतच जगाला शांततेचा मार्ग दाखवु शकतो. कारण त्यात महात्मा गांधी सारख्या महापुरुषांची तत्व आहेत.

डाॅ नरेश चंद्र यांनी जगात वाढत्या अतिरेकीपणाच्या युगात आपल्या वर्तनात गांधींजींची तत्त्व बिंबवण्याबाबत सांगितले.