अयोध्या: उत्तरप्रदेशातील आयोध्येत समाजवादी पार्टीचे सपाचे नेते मोईद खान (Moid khan Ayodhya) यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोईद खानच्या बेकरीवर बुलडोजर चढवला आहे. तसेच मोईद खानच्या इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे. मोईद खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, खासदार अवदेश प्रसाद यांनी वकिलपत्र घेतलं. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील असं आश्वासन दिलं.
आयोध्येचे प्रशासकीय अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरदसा येथील मोईद खानच्या बेकरी शॉपमध्ये पोहोचले. यावेळी प्रमुख अधिकारी आणि कागदपत्रे घटनास्थळी ज्यावेळी आली, त्यावेळी घटनास्थळी बुलडोजर चढण्यात आला. यावेळी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. दरम्यान मोईन खानच्या बेकरीला सील ठोकण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा उपयुक्तांनी मोईद खानचा परवाना देखील रद्द केला होता.
मिळालेल्या माहतीनुसार, बेकरीत असलेले खाद्यपदार्थ तसेच काही बिस्कीट बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर बेकरीला सील लावण्यात आलं. घराच्या काही बेकायदेशीर ठिकाणी बुलडोजर चढवण्यात आला. या मालमत्तेची अंदाजे किंमत ही लाखो रूपये असल्याचं सांगितलं जातंय.
मोईद खानचे घर आणि बेकरी ही एकाच ठिकाणी आहे.या भागात हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मांची लोकं राहतात, त्यामुळे मोईद खान राहत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आझाद निषाद पक्षाचे आमदार संजय निषाद यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आरोप केला की, आयोध्येचे खासदार अवदेश प्रसाद यांनी प्रशासनात बलात्कार आरोपी मोईद खानची वकिली केली. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यावर विलंब झाला.
त्यानंतर माध्यमांसोबत बोलत असताना, मंत्री संजय निषाद यांनी मोईद खानवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना संजय निषाद ढसाढसा रडू लागला होता. यावेळी सापाविरोधात आणि मोईद खानविरोधात असलेल्या लोकांनी निषेध केला.