कन्झ्युमिंग क्षेत्राभिमुख 'अॅक्सिस कन्झम्पशन फंड' लाँच; मुख्य गुंतवणूक अधिकारी काय म्हणाले, जाणून घ्या

२३ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०२४ पर्यंत सबस्क्रिप्शन करता येणार

    22-Aug-2024
Total Views | 46
consuming sector oriented axis consumption fund lanch


मुंबई :     
  वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे देशाचा आर्थिकपट झपाट्याने बदलत असताना अॅक्सिस कन्झम्पशन फंड लाँच करण्यात आला आहे. देशातील कन्झ्युमर क्षेत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी व गुंतवणूकदारांना वाढत्या ग्राहकांच्या मागणीचा फायदा या फंडातून होणार आहे. धोरणात्मक संधीच्या माध्यमातून अॅक्सिस म्युच्युअल फंड देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक आहे.

दरम्यान, निफ्टी इंडिया कन्झम्पशन टीआरआय विरुध्द आपली ओळख निर्माण करणारी नवीन फंड ऑफर दि. २३ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०२४ पर्यंत सबस्क्रिप्शनकरिता खुले असणार आहे. नवीन फंड लाँच करताना फंड मॅनेजर हितेश दास, श्रेयश देवलकर आणि कृष्णा नारायण(ओव्हरसीज सिक्युरिटीज) या थीमॅटिक गुंतवणूकीकरिता कार्यरत असणार आहेत.

देशातील कन्झ्युमर क्षमता, अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढती डिस्पोजेबल उत्पन्न आणि शहरीकरण या प्रमुख आर्थिक घटकांद्वारे तरुण आणि महत्त्वाकांक्षी लोकसंख्येसह येत्या काही वर्षांत भारतातील ग्राहक खर्चात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच, अॅक्सिस कन्झ्म्पशन फंडाचे उद्दिष्ट एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ प्रदान करणे असून यात एफएमसीजी, ऑटो, टेलिकम्युनिकेशन, हेल्थकेअर, रियल्टी आणि अन्य काही कन्झ्युमिंग क्षेत्रांचे विस्तृत स्पेक्ट्रम प्रतिबिंबित करण्यात आले आहे, असे आशिष गुप्ता, मुख्य गुंतवणूक अधिकारी, एएमसी यांनी सांगितले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121