'छावा'चा टीझर लीक! संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलचं रौद्ररुप

    15-Aug-2024
Total Views | 165

chhava  
 
 
 
मुंबई :अभिनेता विकी कौशलचा पहिला ऐतिहासिक चित्रपट छावा लवकरच भेटीला येणार आहे. पण चित्रपटाच्या अधिकृत टीझर, ट्रेलर प्रदर्शनापुर्वीच छावा चित्रपटाचा टीझर लीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमधील विकीचा लूक व्हायरल झाला होता. त्यानंतर आता 'छावा' चा टीझर लीक झाल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' चित्रपटाच्या आधी 'छावा' सिनेमाचा टीझर दाखवला जात आहे.
 
सोशल मिडियावर 'स्त्री २' चित्रपट ट्रेंडिंग होत आहे. राजकुमार राव-श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' चे शो चित्रपटगृहात सुरु होण्यापूर्वी विकी कौशलच्या 'छावा'ची झलक बघायला मिळत आहे. लीक झालेल्या टीझरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आक्रमक अवतारात दिसत आहे. गनिमांशी एकहाती सामना करणाऱ्या संभाजी महाराजांच्या रौद्ररुपात विकी झळकतोय. या टीझरमध्ये शेवटी सिंहासनावर आरुढ झालेले संभाजी महाराज बघायला मिळत आहे. विकीला संभाजी महाराजांच्या रुपात बघणं ही एक पर्वणी असणार यात शंका नाही.
 
 
 
'छावा' चा टीझर लीक होताच प्रेक्षकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. विकी कौशलच्या संभाजी महाराजांच्या लूकला आणि त्याच्या अभिनयाला चाहत्यांनी विशेष पसंती दिली आहे. 'छावा' च्या लीक झालेल्या टीझरमध्ये चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचेही दिसत आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आता आतुर झाले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121