भारताने बनवले जगातील सर्वात शक्तीशाली स्फोटक; 'या' स्फोटकाची क्षमता पाहून शत्रूंना फुटेल घाम

    02-Jul-2024
Total Views | 84
 sebex 2
 
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या तीन दलांच्या युद्ध क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कारण, भारताने एक स्फोटक पदार्थ तयार केला आहे जो ट्रायनिट्रोटोल्युएन (TNT) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला SEBEX-2 असे नाव देण्यात आले आहे. हा स्फोटक जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटकांपैकी एक आहे.
 
वृत्तानुसार, यामुळे भारताच्या स्फोटक क्षमतेत क्रांती होऊ शकते. बॉम्ब, तोफखाना आणि वॉरहेड्समध्ये सेबेक्स-2 चा वापर केल्याने त्यांची विध्वंसक क्षमता अनेक पटींनी वाढेल. नवीन स्फोटकांचे वजनही खूप कमी आहे. भारतीय नौदलाने SEBEX-2 ची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत नौदलाने SEBEX-2 ची चाचणी केली. यामुळे भारतीय लष्कराकडे असलेल्या विद्यमान शस्त्रांची क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.
  
विशेष म्हणजे हे स्फोटक एका भारतीय कंपनीने बनवले आहे. स्फोटकांची प्राणघातकता मोजण्याचे टीएनटी हे मापक आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या वॉरहेडमध्ये आजपर्यंतचा भारताचा सर्वात घातक नॉन-न्यूक्लियर स्फोटक वापरण्यात आला होता. ज्याची प्राणघातक शक्ता १.५० TNT समतुल्य आहे. जगातील बहुतेक वॉरहेड्समध्ये १.२५-१.३० दरम्यान TNT समतुल्य असते. SEBEX-2 चे TNT समतुल्य २.०१ आहे, म्हणजे ते आतापर्यंतचे सर्वात घातक अपारंपरिक स्फोटक आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121