बेस्टच्या चाहत्यांचा अनोखा उपक्रम

बोरिवली पूर्वेतील मागाठाणे बस डेपो येथे ५५९४ ही बस बस सुशोभित करण्यात आली.

    02-Jul-2024
Total Views | 22

best bus


 मुंबई, दि.२ :
मुंबईतील १७हून अधिक बस रसिकांनी शेवटच्या बेस्टच्या मालकीच्या टाटा सीएनजी नॉन-एसी बसला निरोप दिला. शनिवार दि.१ रोजी या बसमधून संपूर्ण शहरात फेरी मारण्यात आली. या निरोप समारंभात चालक आणि वाहकांचा सन्मान करताना केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, मार्ग निर्देशकांसाठी रोलर बोर्ड असलेली ही शेवटची बस होती. रोलर इंडिकेटर असलेल्या फक्त उरलेल्या बसेस नॉन-एसी मिडी बसेस आहेत तर ताफ्यातील इतर सर्व बसेस इलेक्ट्रॉनिक रूट इंडिकेटरमध्ये बदलल्या आहेत.

या उपक्रमात, शनिवार, दि.३० रोजी १७ बसचे चाहते एकत्र आले होते. बोरिवली पूर्वेतील मागाठाणे बस डेपो येथे ५५९४ ही बस बस सुशोभित करण्यात आली. यावेळी केक कापण्यात आला तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नारळ फोडला. डेपोचे कर्मचारी, ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मिठाई आणि गुलाबाचे फूल वाटप करण्यात आले. नेहरू तारांगणात ब्रेकच्या वेळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमात मागाठाणे डेपोपासून सुरुवात झाली. संपूर्ण हायवे, शासकीय वसाहत वांद्रे पूर्व, वांद्रे वरळी सी लिंक, वरळी, नेहरू तारांगण, पेडर रोड, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया, सीएसएमटी, ईस्टर्न फ्रीवे, सायन, च्या अंतर्गत भागात फिरलो. चुनाभट्टी रेल्वे क्रॉसिंग, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेव्हीएलआर, आरे कॉलनी आणि हायवेवरून ही बस मागाठाणे डेपोकडे परत आली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121