ठाण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येणार आठ नवे मार्ग

    16-Jul-2024
Total Views | 45
वाहतूक
 
मुंबई : ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ८ पायाभूत प्रकल्पांसाठी कंपन्यांनी २५ निविदा दाखल केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पांच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्या असून आठ प्रकल्पांच्या कामांसाठी सहा कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट, नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अॅप्को इन्फ्राटेक, इगल इन्फ्रा या कंपन्यांचा समावेश आहे.
 
एमएमआरडीएने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी या प्रकल्पांच्या निविदा काढल्या होत्या. त्यावेळी ठाण्यातील प्रकल्पांच्या तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गाचा विस्तार करण्यासाठी छेडा नगर ते ठाणे उन्नत मार्ग, तसेच पुढे आनंदनगरपर्यंत उन्नत मार्गाची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
 
तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे आणि भिवंडी परिसरात खाडीपुलांची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान यातील सहा प्रकल्पांच्या निविदा तांत्रिक कारणामुळे जूनमध्ये रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच त्या प्रकल्पांच्या पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आल्या होत्या. आता या प्रकल्पांच्या तांत्रिक निविदा सोमवारी उघडण्यात आल्या. त्यामध्ये सहा कंपन्यांनी २५ निविदा भरल्याचे समोर आले.
 
या कंपन्यांनी भरल्या निविदा प्रकल्प - प्रकल्पाची किंमत
- आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग - १६०० कोटी रु.
- पूर्व द्रुतगती मार्गाचा छेडानगर येथून ठाण्यापर्यंत विस्तार प्रकल्प - २५६० कोटी रु.
- कासारवडवली ते खारबाव खाडीपुल - १४५३ कोटी रु.
- कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर खाडीपुल - २७४ कोटी रु.
- एनएच ४ ते कटाई नाका उन्नत मार्ग - १८८७ कोटी रु.
- कल्याण मुरबाड रोड ते बदलापुर ते पुणे लिंक रोड ते वालधुनी नदी कर्जत कसारारेल्वे मार्गावरून रस्ता -
- गायमुख ते पायेगाव खाडीपुल - ९२९ कोटी रु.
- ठाणे कोस्टल रोडचा बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग - २५९७ कोटी रु.
  
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121