पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना ३0 हजार कोटींचे प्रकल्प भेट

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच पहिल्यांदाच मोदी मुंबईत

    13-Jul-2024
Total Views | 23

PMO



 मुंबई, दि.१३: प्रतिनिधी 
तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच मुंबई भेटीत मुंबईकरांना तीेस हजार कोटींच्या प्रकल्पाची भेट दिली. शनिवार दि.१३ रोजी गोरेगाव नेसको सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण दिलेल्या वचनाची आठवण करून देताना सांगितले, "मी म्हणालो होतो एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात तीन पट वेगाने काम करेल. आज हा त्याचाच एक नमुना आहे."
गोरेगाव नेस्को सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मंचावर उपस्थित होते. यासह महायुतीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे याठिकाणाहून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेले प्रकल्प

१. ठाणे बोरिवली जुळे बोगदे

प्रकल्प खर्च :
१६,६०० कोटी

फायदे :

एकतासाहून अधिक वेळेची बचत होईल.

ठाणे ते बोरिवली अवघ्या १२ मिनिटात पार करणे शक्य होईल.

दररोज एक लाख प्रवाशांना याचा फायदा होईल.

 दरवर्षी दीड लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन घट होईल.

२. गोरेगाव मुलुंड लिंक रोड (तिसरा टप्पा)

प्रकल्पासाठी खर्च :
६५०० कोटी

फायदे :
कार्बन उत्सर्जनात दरवर्षी अंदाजे 23 हजार मेट्रिक टनची घट होईल.
प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून केवळ २० मिनिटांवर येईल.

३. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

खर्च :
५५४० कोटी

फायदे:

१८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांना रोजगरक्षम प्रशिक्षण मिळणार.

यातून रोजगाराच्या संधी मिळतील.

प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळतील.

 उद्योगांना मिळणार कुशल मनुष्यबळ मिळेल.

४.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे लोकार्पण

 प्रकल्प खर्च:
₹ 52 कोटी

फायदे:

२४ डबे लांबीच्या प्लेटफॉर्ममुळे प्रत्येक गाडीत अधिक प्रवासी प्रवास करू शकतील.

विस्तारित प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना चढणे आणि उतरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होईल.

परिणामी, गर्दी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल.

५. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी

प्रकल्प खर्च :
₹ 813 कोटी

फायदे :

कल्याण यार्डमध्ये रेमॉडेलिंग नंतर लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रहदारीचे पृथक्करण होईल.

 गुड्स यार्डच्या एकीकरणामुळे कार्यक्षमता वाढेल.

 रिमॉडेलिंगमुळे गाड्या अधिक वेगाने हाताळली जातील.

 गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल.

६.लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे लोकार्पण

प्रकल्प खर्च :
64 कोटी

फायदे :

लांब प्लॅटफॉर्मवर अधिक कोचच्या गाड्यांना सामावून घेता येईल.

 ज्यामुळे प्रति ट्रेन अधिक प्रवाशांची सोय होईल.

 वाढलेली रहदारी हाताळण्यासाठी स्टेशनची क्षमता सुधारेल.

 प्रवाशांना चढणे आणि उतरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होईल.

 गर्दी कमी होऊन, जा-ये करणे सुलभ होईल.

७. तुर्भे येथे गति शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्प

प्रकल्पाची किंमत
:₹ 27 कोटी

फायदे :

स्थानिक लोकांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध होतील.

 मालवाहतूक कमाईतून महसुलात वाढ,

 मुंबईच्या विकासासाठी सिमेंट आणि इतर वस्तुच्या आवागमनासाठी एक अतिरिक्त टर्मिनल मिळेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121