NEET-UG : एका पत्रकाराला अटक; झारखंडमधील हिंदी दैनिकाशी संबंध!
29-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
तपासादरम्यान, सीबीआयने एहसान उल हक आणि इम्तियाज आलम तसेच हजारीबागमधील पत्रकार मोहम्मद जमालुद्दीन आणि मोहम्मद सलाउद्दीन यांचाही माग काढला होता. यामध्ये पत्रकार जमालुद्दीनला सीबीआयने अटक केली असून जमालुद्दीन झारखंडमधील एका हिंदी दैनिकाशी संबंधित आहे. पेपर लीक प्रकरणावरून एहसान पत्रकार जमालुद्दीन आणि सलाउद्दीन यांच्याशी सतत चर्चा करत असल्याचे उघडकीस आले आहे.
सीबीआय आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दि. ०३ मे रोजी नीट(NEET) प्रश्नपत्रिका प्रथम कुरिअर एजन्सी ब्लू डार्टच्या हजारीबाग नूतन नगर केंद्रातून बँकेत नेण्याऐवजी ओएसिस शाळेत आणण्यात आल्या. यानंतर येथून बँकांना पाठवण्यात आल्या असून ओएसिस शाळेतच कागदी पाकिटे उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. हे सर्व संजीव मुखियाशी संबंधित असून मुखियाची टोळी कागदी पेट्या तोडण्यात माहीर आहे.