नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
Read More
‘नीट’ आणि ‘नेट’ परिक्षा २०२४ मध्ये झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच पब्लिक एग्जामिनेशन (प्रिवेंशन ऑफ अनफेयर मीन्स) कायदा २०२४ लागू केला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानेही त्याची अधिसूचना जारी केली आहे.
‘नीट’ आणि ‘नेट’ परीक्षांमधील पेपरफुटीच्या गोंधळानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकवर्गातही संतापाचे लोण पसरले. यासंबंधी सरकारने तत्परता दाखवत पेपरफुटीविरोधात कायदाही लागू केला. अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती झाल्यास कायद्याची कडक अंमलबजावणी होईलच; पण मुळात अशा घटना घडू नये, यासाठी व्यवस्थाबदलही तितकाच आवश्यक. त्यासाठी काय करता येईल, याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
'NEET-UG' प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनुराग यादवने गैरकृत्याची कबुली दिली आहे. तसेच, अन्य अटकेत असलेल्या परीक्षार्थींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
'NEET-UG' पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान सरकारमधील कनिष्ठ अभियंता(जेई) पदावर कार्यरत असणाऱ्या सिकंदर कुमार यदुवंशी याचे नाव 'NEET-UG' पेपर लीकप्रकरणात उघडकीस आले आहे.
नीट(NEET) परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नवा आदेश दिला असून एनटीए(नॅशनल टेस्ट एजन्सी) आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देताना म्हटले आहे की, जर एखाद्याच्या बाजूने 0.001 टक्के निष्काळजीपणा असेल, तर त्यावर कारवाई करून त्याला पूर्णपणे सामोरे जावे.