'NEET-UG' प्रकरणात आरोपीने दिली कबुली; धक्कादायक माहिती उघड!

    20-Jun-2024
Total Views | 62
neet-paper-matched-with-exam-leaked


नवी दिल्ली :       'NEET-UG' प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनुराग यादवने गैरकृत्याची कबुली दिली आहे. तसेच, अन्य अटकेत असलेल्या परीक्षार्थींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने सांगितले की, जी प्रश्नपत्रिका फुटली होती तीच प्रश्नपत्रिका परीक्षेत आली होती आणि १०० टक्के तेच प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते.




दरम्यान, नीट प्रवेश परीक्षेसाठी योजिलेली प्रश्नपत्रिका माझ्याकडे एक दिवस आधी आली होती, असेही आरोपीने पोलीस जबाबात म्हटले आहे. आरोपीने पुढे म्हटले की, मी कोटा येथील ॲलन कोटिंग सेंटरमध्ये राहून नीट(NEET) परीक्षेची तयारी करत होतो. माझे काका सिकंदर प्रसाद यादव यांनी सांगितले की NEET परीक्षा ५ मे २०२४ रोजी आहे, कोटाहून परत या. परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने असेही सांगितले की, मी कोटाहून परत आलो आणि ४ मे २०२४ च्या रात्री मला माझ्या काकांनी अमित आनंद आणि नितीश कुमार यांच्यासोबत परीक्षा केंद्रावर सोडले. जिथे नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्या होत्या आणि रात्री अभ्यास करून लक्षात ठेवायला लावल्या होत्या. परीक्षा केंद्र डी.वाय. पाटील शाळेत होते व परीक्षेला बसण्यासाठी शाळेत गेलो तेव्हा लक्षात ठेवलेली प्रश्नपत्रिका परीक्षेत बरोबर सापडली. परीक्षेनंतर अचानक पोलिसांनी पकडल्याचेही आरोपीने सांगितले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121