पहिल्याच पावसात दिल्ली जलमय! खासदारांच्या घरात शिरले पाणी

    28-Jun-2024
Total Views | 32
 Delhi rains
 
नवी दिल्ली : मान्सूनपूर्व पाऊसाने दिल्ली-एनसीआरला चांगलेच झोडपले आहे. गुरुवार-शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने दिल्लीतील अनेक ठिकाणी लोकांना समस्याचा सामना करावा लागला. दिल्लीतील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले, त्यामुळे अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शुक्रवार, दि. २८ जून २०२४ सकाळी ५.३० वाजता दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल-१ वर एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी झाले.
 
विमानतळाच्या टर्मिनल-एक वर बसवण्यात आलेली छत्री घसरल्याने हा अपघात झाला असून, त्याखाली उभ्या असलेल्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना भरपाई जाहीर केली आहे. दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ५.३० च्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर पडलेली छत २००९ मध्ये बांधली गेली होती.
 
या प्रकरणी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, सरकार मृतांच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. DIAL (दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) चे प्रवक्ते म्हणाले, "आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक च्या जुन्या भागातील छताचा काही भाग पहाटे पाच च्या सुमारास कोसळला. या घटनेमुळे, टर्मिनल एक वरून सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत आणि सुरक्षा उपाय म्हणून चेक-इन काउंटर बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
 
दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात पाणी साचले होते. दक्षिण दिल्लीतील गोविंदपुरी आणि नोएडा सेक्टर ९५ मध्ये पाणी साचले होते. दिल्लीतील रस्ते जलमय झाले आहेत. रायसीना हिल्सची छायाचित्रेही समोर आली आहेत. अनेक खासदारांच्या घरासमोर पाणी साचल्याने लोक घरातच अडकून पडल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या आयटीओ परिसरात सर्वत्र पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एएनआयने ड्रोनच्या मदतीने बनवलेला व्हिडिओ जारी केला आहे, ज्यावरून परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयटीओवर पावसामुळे वाहने रेंगाळताना दिसत आहेत.
 
आयएमडीनुसार, दि. २८ जून रोजी दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाऱ्यासह वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि जोरदार थंड वारेही वाहत होते. हवामान खात्याने ३ जुलैपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121