मुंबई : मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य करून महिला बचत गटांना वेगवेगळ्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिलेले आहे. आता महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. महापालिकेने दिलेल्या संकेतस्थळावर दररोज नवनवीन उत्पादनांची भर पडत असून महिलांना रोजगार मिळत आहे.
घरगुती वापरातील वस्तु, सुशोभिकरणाच्या वस्तु, सौदर्यं प्रसाधने, पर्यावरणपुरक वस्तुंची निर्मिती या महिला बचत गटांकडून केली जाते. बचत गटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी तयार केलेली उत्पादने https://shgeshop.com या संकेतस्थळावर खरेदी करून आपणही महिला सक्षमीकरणाला हातभार लावू शकता,असे आवाहन पालिकेने समाजमाध्यमांवर केले आहे.