मुंबई: डीपटेक स्टार्टअप (Deeptech Startup) कंपनीच्या उद्योगांमध्ये भारतात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः २०२३ मध्ये ही संख्या वाढत ४८० उद्योगावर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर डीपटेक कंपन्यांचे महत्व वाढताना आता भारतातही ही वाढ होत आहे. त्यामुळे भारतात रोजगाराच्या संधी व उद्योगांची स्वायत्तता वाढत आहे. मात्र तंत्रज्ञान विभागातील संस्था Nasscom व Zinnov कंपन्यांनी विंटर फंडिग (निधी) तरतूदीत घट झाल्याचा ट्रेंड कायम राहिल्याचे म्हटले आहे.
निधी कमी होण्याचे प्रमाण वाढल्याने निश्चितच कंपन्यांवर मर्यादा येत आहे. मात्र मोठ्या संख्येने डीपटेक कंपन्यांचा समावेश भारतात झाल्याने स्टार्टअपला गती आली आहे.'इंडिया डिपटेक डाऊन फोरजिंग अहेड (India's Deeptech Dawn: Forging Ahead') या अहवालात म्हटलंय की, स्टार्टअप क्षेत्रात उद्यमितेची लांबी, कौशल्यपूर्ण मानवी संसाधन शोधणे, जागतिक विस्तारीकरण ही तीन मोठी आव्हाने कायम आहेत. अहवालात म्हटल्याप्रमाणे, भारतात सध्या ३६०० हून अधिक डिपटेक स्टार्टअप आहेत. त्यातील ४८० कंपन्या २०२३ मध्ये स्थापन झाल्या होत्या.२०२२ मध्ये स्थापन झालेल्या आकडयांपेक्षा दुप्पट वेगाने डीपटेक कंपन्या भारतात वाढल्या आहेत. मात्र निधी कंपन्यांना कमी प्रमाणात मिळत आहे.
२०२२ मध्ये या कंपन्यांनी ३.७ अब्ज डॉलर्सची उभारणी केली होती जी कमी होत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ८५० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. म्हणजेच या निधीत ७७ टक्क्यांनी नुकसान झाले. कंपनीच्या करारात देखील २५ टक्क्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये घट झाली असे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील आकड्यांच्यानुसार , गेल्या ५ वर्षात डीपटेक कंपन्यांनी १० अब्ज डॉलर्सची निधी उभारणी केली आहे.
अहवालातील चिंता व्यक्त होताना त्यात म्हटले आहे की, भारताने डीपटेक बाबत विस्तारित दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. निधी उभारणीत वाढ करण्याबरोबरच डीपटेक इकोसिस्टीमला पाठिंबा देण्याची गरज आहे तसेच काही पुढाकार घेऊन डीप टेक उभारणीत काही बदल करण्याची गरज असल्याचे निरीक्षण या अहवालात म्हटले गेले आहे.
तसेच यावर अधिक माहिती देताना अहवालात म्हटल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये स्थापन झालेल्या डीपटेक कंपन्यापैकी ७४ टक्के कंपन्यांच्या संस्थापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी आपुलकी वाटल्याने ए आय ( AI) चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.८६ टक्के कंपन्यानी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित केले आहे.
वेंचर कॅपिटल फर्मने गुंतवणूक करताना अडचणींचा सामना करताना लागणार वाढणारा वेळ हे देखील मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्तिकपणे क्षेत्रातील कार्यक्रमांसाठी पुढाकार घेते तसेच खाजगी कंपन्यांना सरकारचा पाठिंबा मिळणे महत्वाचे असल्याचे म्हटले गेले आहे. दुसरीकडे गुंतवणूकदार सीड स्टेज ( Seed Stage) कंपन्यांना फंडिंग करण्यासाठी इच्छुक असल्याने त्या मध्ये धोका तुलनेने कमी असतो असा निष्कर्षही अहवालात मांडला गेला होता.
Nasscom ने सरकारला ' इनोव्हेशन क्लस्टर्स ओळखणे आणि मजबूत करणे, कमजोरांना भांडवलाची उपलब्धता करून देणे, संगणक प्रणालीची पायाभूत सुविधा बनवणे, सुविधा सुलभ करून राष्ट्रीय डिपटेक स्टार्टअप धोरण (NDTSP) अंमलबजावणीचा वेगवान मागोवा घेणे, आयपी फ्रेमवर्क सुधारणे, एकूणच इकोसिस्टीम मजबूत करण्याची शिफारस केली आहे. भारतात सध्या Clarico, Ishitva, GetVu, UptimeAI, HealthPlix, Cloudphysician, Veative Labs या डीपटेक कंपन्यां अस्तिवात आहेत.