खासदार कंगना राणावतच्या सोबत उभे राहिले दिग्दर्शक करण जोहर; म्हणाले, “मी कधीही…”

    13-Jun-2024
Total Views | 28

Karan johar 
 
 
 
मुंबई : नवनिर्वाचीत भाजप खासदार कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगढ विमानतळावर सीआयएसफमध्ये काम करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने गैरव्यवहार केला होता. खासदारासोबत अशी गैरवर्तणूक करणाऱ्या सीआयएसएफ कुलविंदर कौर यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. तसेच, या प्रकरणानंतर कंगनाच्या पाठिशी अनेक लोकं उभी राहिली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर आणि कंगना यांच्यातील वादंग सर्वांनाच माहित आहेत. पण वाद आणि भांडण बाजूला ठेवून करण जोहर यांनी कंगनाच्या समर्थनात प्रतिक्रिया दिली आहे.
 
करण जोहर म्हणाले की, “मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, मग ती शाब्दिक असो किंवा शारीरिक'. सुरुवातीला कोणत्याही कलाकारांनी या प्रकरणावर व्यक्त होण्याचे टाळले होते. पण आता रवीना टंडन, उर्फी जावेद,अनुपम खेर, शेखर सुमन, अशोक पंडित यांनी या घटनेची निंदा केली आहे.
 
 
 
दरम्यान, चंदीगढ विमानतळवर झालेल्या या घटनेनंतर कंगना रणौत दिल्लीत पोहचल्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महासंचलाक नीना सिंह यांना ही सगळी घटना सांगितली. कंगनाने आरोप केला की चंदीगढ एअरपोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला थोबाडीत ठेवून दिली. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले होते. चंदीगढ एअरपोर्टवर असलेलं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलं. कंगना यांना थोबाडीत ठेवून दिल्याप्रकरणी कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ८ जून रोजी अटक करण्यात आली.
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121