कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी यासाठी एका संघर्ष समितीने नुकतीच एक सभा घेतली. या सभेत संघर्ष समितीने आमच्यावर टिका केली आहे. आमच्यावर टीका करणारे काल परवापर्यत आमच्यासोबत होते. तेच लोक प्रतिनिधी, आजी माजी झाल्यावर आमच्यावर टीका करत आहेत असे टोला 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळण्यात यावी याकरिता संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे. त्यांचा हा लढा सुरू असतानाच संघर्ष समितीत मागील वर्षी फूट पडली. त्यामुळे 27 गावांची वेगळी नगरपालिका व्हावी याकरिता दोन्ही संघर्ष समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच एका संघर्ष समितीच्या वतीने एक सभा घेण्यात आली. त्यात संघर्ष समितीवर टीका करण्यात आली. 27 गावांच्या विविध प्रश्नावर मंगळवारी उपाध्यक्ष वझे यांनी आयुक्त अभिनव गोयल याची भेट घेतली. यावेळी वझे यांनी उपरोक्त टोला दिला. वझे यांनी आमच्या समितीचे अध्यक्ष पद गेल्या 15 वर्षापासून गंगाराम शेलार यांच्याकडे आहे. आता जे समितीचे अध्यक्ष झाल्याचा दावा करीत आहे. त्या अध्यक्ष वर्षाभरापूर्वी झाले असे ते सांगत होते. त्यांना 27 गावांच्या प्रश्नावर बैठक घेण्यासाठी एक वर्ष का लागले ? असा सवाल देखील वझे यांनी उपस्थित केला. तसेच स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मुद्दयावर आजही आम्ही ठाम आहोत. आमचा मुद्दा 27 गावांचा विकास झाला पाहिजे असा आहे. त्यापासून आम्ही जरा ही विचलित झालो नाही असे ही वझे यांनी सांगितले.