पुणे अपघाताची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले

    01-Jun-2024
Total Views | 168
 
Accident
 
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात चर्चेत असतानाच आता या अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. एका अल्पवयीन मुलीने मालवाहू टेम्पोने धडक देत दुचाकीस्वाराला चिरडले आहे. शिरुरमधील अरणगाव येथे ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.
 
अरणगाव येथील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी टेम्पो चालवत होती. यावेळी संतोष लेंडे हे तिच्या बाजूच्या सीटवर बसले होते. दरम्यान, तिने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. अरुण मेमाणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिचे वडील दोघेही पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
 
हे वाचलंत का? -  नाचता येईना अंगण वाकडे! काँग्रेस पक्षाच्या 'त्या' निर्णयावर बावनकुळेंचा टोला
 
दुसरीकडे, पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची आई शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे. वेदांतचे ब्लड सँपल बदलल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हेदेखील पोलिस कोठडीत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121