१९९१ नंतर पहिल्यांदाच १०० टनहून अधिक सोने इंग्लंडमधून आरबीआयकडे परत !

आरबीआयचा धोरणात्मक निर्णय!

    31-May-2024
Total Views | 2017

rbi
 
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील विदेशी मुद्रा स्थलांतरित करण्यासाठी आरबीआयने १०० टनहून अ़धिक सोने भारतात परत आणले आहे. आरबीआयने (Reserve Bank of India) ने हे सोने बँक ऑफ इंग्लंडकडे सुरक्षित कस्टडीत ठेवले होते. भारतात परत आणण्याचे मागील वर्षी भारताने ठरविल्याने अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
१९९१ नंतर पहिल्यांदाच हे सोने भारतात परत आणले गेले आहे. आंतरराष्ट्रीय सेटलमेंटचा भाग म्हणून हे सोने इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले होते.१९९१ साली भारतात जागतिक उदारीकरण केले गेले होते. त्यापूर्वी देश आर्थिक चणचणीत असताना हे सोने इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले होते.अनेक देशांनी आपले सोने बँक ऑफ इंग्लंडकडे सुरक्षित स्वरूपात ठेवलेले होते. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, मुंबई व नागपूर येथे या सोन्याचे अधिग्रहण होणार आहे.
 
सोने परत आल्यामुळे आरबीआयकची सुरक्षित साठवणूकीचा खर्च देखील वाचणार आहे.आरबीआयशशशने जारी केलेल्या रद्द आकडेवारीनुसार, केंद्राकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत परकीय चलन साठ्याचा एक भाग म्हणून ८२२.१० टन किमतीचे सोने होते, जे मागील वर्षी याच कालावधीत ७९४.६३ टन होते. आता भारताकडे सोन्याचा मुबलक साठा असून ८ महिन्यापर्यंत आयातीचा खर्च हा साठा पेलवू शकतो.
 
मार्च १९९१ मध्ये परदेशी थकीत देणी ७२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. विदेशी मुद्रा ५.८ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले होते. अशा परिस्थितीत भारताने हे सोने परदेशात ठेवून विदेशी मुद्रा वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121