मे महिन्यात १८ वर्षातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती

एचएसबीसी कंपोझिट आऊटपुट इंडेक्स अहवालातील माहिती

    25-May-2024
Total Views | 33

Employment Generation
 
 
 
मुंबई: भारतातील खाजगी क्षेत्रातील कारभारात मोठी वाढ झाली आहे. जुलै २०१० नंतर खाजगी क्षेत्रातील कामगिरीत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशातील सकारात्मक स्थिती, वाढलेली मागणी, वाढलेले उत्पन्न यामध्ये वाढ झाल्याने खाजगी क्षेत्रातील वाढ झाल्याचे खाजगी अहवालात म्हटले गेले आहे.
 
१८ वर्षातील सर्वाधिक वाढ रोजगार निर्मितीत झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. एचएसबीसी कंपोझिट आऊटपुट इंडेक्स (HSBC Flash India Composite Output Index) सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली असून यामध्ये मे मध्ये आऊटपुट निर्देशांक ६१.७ वर पोहोचला असल्याचे म्हटले आहे जो एप्रिल महिन्यात ६१.५ टक्के होता.
 
याविषयी प्रतिक्रिया देताना,एनएसबीसीचे मुख्य भारताचे अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या,' नवीन डेटाने दोन्ही क्षेत्रांसाठी नवीन निर्यात ऑर्डरची ताकद दर्शविली आहे, जी सप्टेंबर 2014 मध्ये मालिका सुरू झाल्यापासून सर्वात जलद गतीने वाढली आहे.'या शिवाय उत्पादन क्षेत्रात देखील मोठी वाढ झाल्याचे यात स्पष्ट झाले आहे. एकूण मागणीत वाढ झाल्याने उत्पादनात वाढ झाली असल्याचे यात म्हटले गेले आहे. या महिन्यात निर्देशांक ५८.४ वर पोहोचले आहे एप्रिल महिन्यात हा निर्देशांक ५८.८ वर पोहोचला होता. निर्देशांकात किंचित घट झाली असली तरी साधारण सरासरीहून हा आकडा जास्त पातळीवर आहे. सेवा क्षेत्रातील निर्देशांकात देखील वाढ झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.
 
देशातील सकारात्मकता ' फ्युचर आऊटपुट इंडेक्स (Future Output Index) या निर्देशांकात देखील झळकली आहे. भंडारी यांनी गेल्या ११ वर्षात रोजगारातील सकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे यात स्पष्ट केले आहे. यामुळे भरतीत देखील अनेक कंपन्यांनी वाढ केली आहे. मागील वर्षात यात हळू प्रकिया झाली असली तरी मे महिन्यात यात मोठी सुधारणा झाली असल्याचे भंडारी यापुढे म्हणाल्या आहेत. एकूणच उत्पादन व सेवा क्षेत्रातील व्यवसायिक व्यवसायिक उलाढालीत २१ महिन्यातील सर्वाधिक झाल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121