भारताने काही आयटी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील निर्बंध कायम असल्याचे सांगितले

नोंदणीकृत अथवा मानकांची पूर्तता नसलेल्या आयाती वस्तूवर निर्बंध कायम

    21-May-2024
Total Views | 33

Electronic
 
 
मुंबई: भारताने नोंदणीकृत नसलेल्या किंवा पालन न करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर निर्बंधांची पुष्टी केली आहे. सरकारने २०२१ मध्येच हा आदेश दिला होता असे सरकारचे म्हणणे आहे. 'या सूचनेचा कुठलाही अर्थ नाही' या श्रेण्यांसाठी आयात धोरण तसेही प्रतिबंधिततच होते त्यामुळे त्यांच्या धोरणात कुठलाही नवा बदल नसल्याचे याची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
 
यापूर्वी सरकारने परदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला होता मात्र यात काही बदल करून आयातीवरील प्रतिबंध हटवला असला तरी नोंदणीकृत नसलेल्या अथवा नियमांचे पालन करत नसलेल्या आयात इलेक्ट्रोनिक वस्तूंना प्रतिबंध कायम असणार आहे.
 
२०२१ सालीच हा आदेश पारित करण्यात आला असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. मात्र त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली होती. आयात केलेल्या वस्तू भारतीय मानकांचे प्रतिनिधित्व करत असल्याची खात्री या वस्तूंना करावी लागणार आहे. सेकंड हँड विलायती वस्तू वापरण्यासाठीही या वस्तूंना (Indian Bureau Standards (IBS) चे पालन करावे लागणार आहे. याशिवाय यावरील लेबलिंगचे चेकिंग केले जाऊ शकते.
 
मानकांची पूर्तता न करणारी आयात केलेली उत्पादने ही करत पाठवली जाऊ शकतात अथवा त्या वस्तू पुन्हा निर्यात अथवा विल्हेवाट लावण्याचा सरकारला असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121