'पंचायत ३' अखेर 'या' दिवशी भेटायला, फुलेरा गावचे सचिवजी कोणत्या गावात जाणार?

    02-May-2024
Total Views | 45
फुलेरा गावचा नवा सचिव काय धुमाकुळ घालणार?
 
 

panchayat  
 
मुंबई : लोकप्रिय वेब सीरीज ‘पंचायत’चा (Panchayat 3) तिसरा सीझन लवकरच भेटीला येणार असून आता फुलेरा गावच्या सरपंचजीची बदली कोणत्या गावात झाली असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पंचायत ३’ (Panchayat 3) कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ती प्रतिक्षा संपली असून प्राईम व्हिडीओने प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.
 
बिहारमधील एका खेडेगावातील कथा सांगत तेथील ग्रामपंटायत कशी चालते? तिथला सचिन कशी कामं करतो आणि त्या भोवती कशा घटना घडतात हे पंचायत या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आले होते. या वेब सीरिजचा पहिला सीझन २०२०, दुसरा २०२२ मध्ये आणि आता तिसरा २०२४ मध्ये भेटीला येत आहे. पंचायत ३ Amazon Prime Video वर २८ मे २०२४ पासून प्रेक्षकांना पाहता येणार असून या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. दरम्यान, प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावरुन 'पंचायत ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
 

panchayat  
 
काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'पंचायत ३' च्या टीझरमध्ये फुलेराचे गावचे लाडके सचिव अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) बदली दुसऱ्या गावात करण्यात येते. अभिषेकच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेशची फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येतो. त्यामुळे आता नेमकं फुलेरा गावात काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ध्याय आहे असे उदगार कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित विकसित भारत संकल्प सभेच्या उदघाटनाची वेळेस काढले. विकसित भारत संकल्प सभेस कांदिवली पूर्व विधानसभेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत उत्साहात मोठ्यासंखेने उपस्थित होते. नरेंद्र मोदीजींच्या ११ वर्षांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत गरिबीवर यशस्वीपणे मात करतो आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121