
मुंबई: रिझर्व्ह बँकेने सोने संकलनात लक्षणीय वाढ केली आहे. आठवड्यातील आरबीआयच्या डेटानुसार आरबीआयने ६ टन सोने अधिक खरेदी करून सोन्याचा साठयात वाढ केली आहे. ही वाढ केवळ फेब्रुवारीत झालेली आहे. सोन्याचा साठा आता १३ टनांपर्यंत वाढत एकूण सोने ८१७ टनांपर्यंत पोहोचले असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील संथगतीने चालेल्या अर्थव्यवस्थेचा तसेच भारतीय रुपयांच्या मूल्यांकनात चढ उतार व संकटकालीन तरतूद म्हणून रिझर्व्ह बँकेने विदेशी मुद्रेचा (Foreign Exchange Reserves) मोठा संचय सुरू केला आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून आरबीआयने धनाचा संचय सुरू केला.
जगातील सोन्याच्या बाजारात भारताचे मोठे योगदान आहे. इतर देशाच्या सेंट्रल बँकांचा या जागतिक व्यवहारात महत्वाचा रोल असतो. या पद्धतीने आरबीआयने अर्थव्यवस्था स्थिर व सुदृढ ठेवण्यासाठी सोने विकत घेण्याचा उपक्रम मार्चमध्ये सुरू केला होता.
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने दिलेल्या अहवालानुसार, जगातील सगळ्या सेंट्रल बँकांनी फेब्रुवारी महिन्यात आपला सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ करत सुमारे १९ टनांपर्यंत सोने साठा पोहोचला आहे. मात्र जानेवारी महिन्यात सोने खरेदीत ५८ टक्क्याने साठा कमी झाला होता. पीपल बँक ऑफ चायनाने सर्वाधिक सोन्याच्या साठ्यात वाढ करत १९ टनांपर्यंत सोने साठा तयार केला होता. फेब्रुवारी महिन्यातील सोने साठांच्या खरेदीत मंदी जाणवली असली तरी आगामी काळात सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.
वैश्विक अस्थिर बाजारात भारताची अर्थव्यवस्था स्थिर राखण्यासाठी आरबीआयने सोने साठ्यात वाढ केली होती. तर दुसरीकडे विदेशी मुद्रा वाढल्याने रुपयांच्या मूल्यांकनात घसरण होताना देशाला दिलासा मिळत आहे.