पीयूष गोयल यांनी घेतले श्री सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे आशीर्वाद!

    12-Apr-2024
Total Views | 62
 
Piyush Goyal
 
मुंबई : लोकसभा निवडणूकांना आता काहीच दिवस शिल्लक असून सर्वत्र निवडणूकांची धामधूम सुरु आहे. यातच उत्तर मुंबई लोकसभेतील महायूतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीदेखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान. त्यांनी गुरुवारी अध्यात्मिक गुरू श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
 
राज्यात यंदा महाविकास आघाडी आणि महायूतीमध्ये थेट लढत राहणार आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभेसाठी महायूतीकडून भाजप नेते पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "सांगली देता का सांगली! न्यायपत्रानेच काढली काँग्रेसची अन्याय यात्रा!"
 
पीयूष गोयल यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता पीयूष गोयल यांनी गुरूवारी अध्यात्मिक गुरू श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. खार (पश्चिम) येथे ही भेट झाली. यावेळी श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू यांनी गोयल यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121