मुंबई: अमेरिकेत युएस कनज्यूमर डेटामध्ये अपेक्षेहून अधिक महागाई वाढली असल्याने लवकरच युएस फेडरल व्याजदरित लवकर कंपित होण्याची शक्यता धूसर झाली आहे. युएसमधील सीपीआय (Consumer Price Index) मध्ये मागच्या महिन्यात ०.४ टक्क्यांनी वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्यातही ०.४ टक्क्यांनी महागाई शत वाढ झाली असल्याचे डिपार्टमेंट ब्युरो ऑफ लेबरस्टॅटिस्टिकस (BLS) ने म्हटले आहे.
पेट्रोल व डिझेल मधील किंमतीत वाढ झाल्याने जूमधील फेडरल व्याजदर कपात होण्याची शक्यता कमीच झाली आहे. अपेक्षेपेक्षा युएस मधील ग्राहक महागाई दरात वाढ झाली. परिणामी अमेरिकन शेअर बाजारात अखेरच्या सत्रात निर्देशांक कोसळले. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सीपीआयमध्ये ३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वाधिक झालेली हा दरवाढ असल्याने याचा परिणाम शेअर बाजारात दिसला होता.
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात गॅसच्या दरात १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कपड्यांच्या किंमतीत ०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.घरभाडे शेल्टर किंमतीत ०.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्नपदार्थात ०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.किराणा मालाच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही.अंडी व मांसाहारी पदार्थात वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेने २ टक्के मर्यादेहून अधिक वाढ झाल्याने ही व्याज दर कपात करणे अमेरिकेत कठीण झाले आहे.
जुलै पासून अमेरिका सेंट्रल बँकेने आपल्या धोरणात ५.२५ ते ५.५० टक्क्यांपर्यंत दर स्थिर ठेवले होते. आता अमेरिकेतील या महागाईत वाढ झाल्याने त्याचा भारतीय शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या वाढलेल्या सीपीआयवर भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे चीफ इन्व्हेसमेंट स्ट्रॅटेजिस्ट डॉ वी के विजयकुमार म्हणाले,'मार्च महागाई प्रिंट ३.४% च्या अपेक्षेविरुद्ध वार्षिक आधारावर ३.५ % वर आल्याने फेडच्या दरांमध्ये कपात करण्याची क्षमता निश्चितच मर्यादित होईल. जानेवारीमधील ३.१% आणि फेब्रुवारीमध्ये ३.२% वरून मार्चमध्ये ३.४ % पर्यंत वाढलेली किंमत वाढली आहे. जूनमध्ये दर कपातीची आशा धुळीस मिळाली. या वर्षाची सुरुवात सहा दर कपातीच्या बाजाराच्या अपेक्षेने झाली. आता ही अपेक्षा कमाल तीन, कदाचित दोनपर्यंत खाली आली आहे. तरीही या वर्षी एकूण ५० बीपी दर कपात शक्य आहे आणि हे बॅकलोड केले जाईल."