लोकसभा उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहिर, राहुल गांधी लढणार 'या' मतदारसंघातून!

    08-Mar-2024
Total Views | 87
Congress candidate list

नवी दिल्ली. :  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी शुक्रवारी सायंकाळी जाहिर केली. त्यामध्ये ३९ उमेदवारांचा समावेश असून काँग्रेस खासदार राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून लढणार आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधींशिवाय भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून तिकीट देण्यात आले आहे. बेंगळुरू ग्रामीणमधून डी.के. सुरेश आणि रायपूरमधून विकास उपाध्याय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत. त्यापैकी २४ जागांवर राखीव प्रवर्गाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यामध्ये 12 उमेदवार आहेत ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे आणि 8 उमेदवार 50 ते 60 वयोगटातील आहेत.पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस आता पूर्णपणे निवडणूक मोडमध्ये आहे. निवडणूक प्रचारात आक्रमक मार्ग अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये पोहोचली असून मुंबई येथील समारोपास आम्ही इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांना निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121