'जनार्दन मून' विरोधात तात्काळ कारवाई करा

रा.स्व.संघाची भारतीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

    30-Mar-2024
Total Views | 140

Janardan Moon

नागपूर :
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाखाली घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ (Janardan Moon Fake RSS) नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या पत्रकार परिषदेत जनार्दन मून यांनी रा.स्व.संघाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती नसलेल्या खोट्या आणि बिनबुडाच्या गोष्टी पसरवून समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. त्यामुळे जनार्दन मून विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रा.स्व.संघ नागपूर महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे यांनी शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोग, दिल्ली आणि नागपूर पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
समाजात संभ्रम निर्माण करून मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. जनार्दन मून यांच्याकडे कोणतीही नोंदणी नसताना ते संघाच्या नावाचा गैरवापर करत आहेत. जनार्दन मून यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि उपरोक्त व्हिडिओ त्वरित हटवण्यासाठी 'यू ट्यूब'ला निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. जनार्दन मून यांच्यावर कलम ४१६, ४१९, ५०५ नुसार आणि लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५० व १९५१ च्या संबंधित तरतुदींनुसार कारवाई करावी, तसेच भविष्यात रा.स्व.संघाचे नाव न वापरण्याचे निर्देश त्यांना द्यावेत, अशी विनंतीही पत्रातून करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : बाबा तरसेम सिंह हत्या प्रकरण; काय म्हणाले आलोक कुमार?

वास्तविक जनार्दन मून यांनी २०१७ रोजी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने संस्थेची नोंदणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. जनार्दन मून यांचा अर्ज सहायक निबंधक अधिकारी, नागपूर यांनी फेटाळला. तेव्हापासून ही व्यक्ती संस्थेच्या नोंदणीसाठी सतत प्रयत्न करत आहे. जानेवारी २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनार्दन मून यांची याचिका फेटाळत निबंधक अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयातही त्यास दिलासा मिळाला नाही. गेली अनेक वर्ष हे लोक संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही त्यास यश न मिळाल्याने प्रसिद्धीसाठी केलेले नाटक असल्याचे म्हटले जात आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121