प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयची क्लीनचीट!

    28-Mar-2024
Total Views | 159
CBI Closes Corruption Case Involving Praful Patel

नवी दिल्ली:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे पटेल यांना क्लीनचीट मिळाली आहे.काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सरकारी विमानवाहतूक कंपनी एअर इंडियासाठी विमान खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारला ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच ठपका पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली या प्रकरणाचा तपास सबीआयने करावा, असा आदेश दिला होता. या आदेशानंतर या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता.सीबीआयकडून अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यात आली. सुमारे ७ वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल, एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन तपास बंद केला आहे. सीबीआयने याविषयी १९ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे कळते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121