आयपीएल २०२४ च्या नव्या हंगात ऑरीने कॉमेंट्री केल्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
मुंबई : आयपीएल २०२४ चा नवा (Orry In IPL 2024) हंगाम सुरु झाला आहे. नुकताच आयपीएलच्या १७व्या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. काही कलाकार आपल्या नव्या चित्रपटांच्या (Orry In IPL 2024) प्रमोशनसाठी आले होते. तसेच, क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंनी कॉमेंट्री दिली आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीदेखील दिसला होता. पण, ऑरीला तिथे पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला होता.
सध्या ऑरीची चर्चा कलाविश्वात सुरु आहे. सेलिब्रिटींसोबत फोटो काढणे, त्यांच्यासोबत विविध पार्टी, लग्नसमारंभात जाणे याचमुळे ऑरी कामच चर्चेत असतो. पण यंदा ऑरी यंदा मात्र आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून आला. जिओ सिनेमावर सुरू असलेल्या आoयपीएलमधील कमेंटेटर्स पॅनेलमध्ये ऑरी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवागबरोबर कॉमेंट्री करत दिसला. पण, कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिकेटमधील दिग्गजांसोबत ऑरीला पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला.
ओरीला पाहून नेटकऱ्यांचा चढला पारा संतापले
'IPL'च्या कॉमेंट्री बॉक्समधील ऑरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ऑरी काय क्रिकेट एक्सपर्ट आहे का?, ऑरी वर्ल्ड कपच्या हीरोंसोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे, ओरीला सेलिब्रिटी मित्रांसोबत सेल्फी घ्यायला हवा, स्टार स्पोर्ट्स छपरी लोकांना का बोलावता?, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे, ऑरीपेक्षा आम्हाला बोलावयला हवं होतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.