न्यायालयाच्या आदेशानंतर भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण सुरू, नवीन पुरावे हाती लागण्याची शक्यता!

    22-Mar-2024
Total Views | 35
 asi-begin-an-archaeological-survey-bhojshala



नवी दिल्ली :    मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या भोजशाळा संकुलाचे एएसआय सर्वेक्षण करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सदर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्वेक्षणावर कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण केले जात असून देवी सरस्वतीच्या मंदिराचे मशिदीत रुपांतर करण्यात आले आहे. तसेच, भोजशाळेला माता वाग्देवीचे मंदिर असल्याचे सांगून हिंदू फॉर जस्टिसने येथे पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

भोजशाळा संकुल संदर्भात न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणाची सुनावणी दि. २९ एप्रिल रोजी होणार असून खटला ज्येष्ठ विधिज्ञ हरिशंकर जैन आणि वकील विष्णू जैन न्यायालयात लढत आहेत. दरम्यान, भोजशाळा संकुलाचे एएसआय सर्वेक्षणाची तयारी पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कार्यवाही कुठलीही अडचण येऊ नये, याकरिता सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास स्थानिक प्रशासनास सांगण्यात आले आहे.


हे वाचलंत का? -   धारस्थित भोजशाळेचे एएसआयकडून सर्वेक्षण उद्यापासून सुरु होणार!
 
 
भोजशाळा सर्वेक्षणासंबंधीचा अहवाल दि. २९ एप्रिल २०२४ रोजी एएसआयला मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. यामाध्यमातून भोजशाळा संकुलातील चिन्हे व इतर पुराव्यांचा अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने दि. ११ मार्च २०२४ रोजी निकाल देताना संकुलाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता एएसआयने सर्वेक्षणाची तयारी पूर्ण केली असून पोलीस प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दि. २२ मार्चपासून मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक परमार काळातील भोजशाळेचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यावेळी बँक्वेट हॉलच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून कॅम्पसभोवती कॅमेरे आणि मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस दलाची वाहने बाहेर उभी केलेली दिसत आहेत. सकाळी सहा वाजता हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121